क्रांतिकारी कामगार शिक्षण मालिका – 10
पैशाचा विकास सामाजिक श्रम विभाजन आणि मालांच्या उत्पादन व विनिमयाच्या विकासाच्या एका विशिष्ट टप्प्यावर होतो. जसजशी मानवी श्रमाची अधिकाधिक उत्पादने माल बनत जातात, तसतसा उपयोग-मूल्य आणि मूल्य यांच्यातील अंतर्विरोध अधिक तीव्र होत जातो कारण परस्पर गरजांचे जुळणे कठीण होत जाते. प्रत्येक माल उत्पादकासाठी त्याच्या मालाला उपयोग मूल्य नसते आणि ते एक सामाजिक उपयोग मूल्य असते, जे तेव्हाच वास्तवीकृत होऊ शकते म्हणजे उपभोगाच्या क्षेत्रात आणले जाऊ शकते जेव्हा त्याचा विनिमय होईल, म्हणजे जेव्हा ते मूल्याच्या रूपात वास्तवीकृत होईल. परंतु हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा दुसऱ्या माल उत्पादकाला पहिल्याच्या मालाची गरज असते आणि पहिल्या माल उत्पादकाला दुसऱ्याच्या मालाची आवश्यकता असते. जसजशी अधिकाधिक उत्पादने माल होत जातात, तसतसे हे अधिक कठीण होत जाते. यालाच आपण उपयोग-मूल्य आणि मूल्य यांच्यातील अंतर्विरोध तीव्र होणे म्हणत आहोत.