कोणतीही आशा शिल्लक आहे का?
नक्कीच आशा शिल्लक आहे.
आशा आहे की आपण अनुभवू
की अजूनही जमीन पुरेशी आहे येथे,
अन्नही पुरेसे आहे
आणि पाणी सुद्धा पुरेसे आहे
इतके की मिळू शकेल
सर्व मनुष्यांना शांती
आणि काही प्रमाणात आरामही.
आशा आहे की
आपल्या सर्वांकडे स्वप्ने शिल्लक आहेत,
आणि अजूनही
बहुतांश लोकांची स्वप्ने साकारली जाऊ शकतात…

स्वप्नांना मजबुतीने पकडून ठेवा
कारण जर स्वप्ने मेली
तर जीवन एका पंख छाटलेल्या पक्ष्यासारखे होईल,
जो कधीही उडू शकत नाही.

लँगस्टन ह्यूज
अनुवाद: स्वप्नजा