फासिस्ट शक्तींची सत्तेवर वाढती पकड : याला उत्तर, ना खोटी आशा – ना हताशा
भाजप सत्तेत असो वा नसो, भारतात सत्तेचे निरंकुश आणि दमनकारी होणे स्वाभाविक आहे, हे आम्ही अगोदरसुद्धा लिहिलेले आहे. रस्त्यावर फासीवादी धिंगाणा वाढत जाणार आहे. फासीवाद विरोधी संघर्षांचे ध्येय फक्त भाजपला सत्तेत येण्यापासून रोखणे एवढेच असू शकत नाही. इतिहासाने आजवर हेच दाखवून दिले आहे की फासीवाद विरोधी निर्णायक लढाई रस्त्यावरच होईल आणि कामगार वर्गाला क्रांतिकारी पद्धतीने संघटित केल्याशिवाय, संसदेत आणि निवडणूकांच्या माध्यमातून फासीवादावर मात केली जाऊ शकत नाही. फासीवाद विरोधी संघर्षांस भांडवलशाही विरोधी संघर्षापासून वेगळे करून पाहता येऊ शकत नाही. भांडवलशाहीशिवाय फासीवादाचा विचार केला जाऊ शकत नाही.