भारत असो किंवा सिंगापूर: कामगारांचे शोषण सगळीकडे सारखेच!
बिंदर कौर सिंगापूर मधे एका घरी घरकाम करतात. ‘मजदूर बिगुल’च्या त्या नियमित वाचक आहेत. शिक्षित असलेले असे बरेच कामगार आहेत जे वेगवेगळ्या जागी आज अतिशय कमी मजुरीवर काम करतात व ते राजकीयदृष्ट्या सजग आहेत. ते बिगुलला वेळोवेळी पत्र लिहून किंवा फोन करून त्यांचे विचार मांडतात. इतर कामगार वाचकांना सुद्धा आम्ही हे आवाहन करतो की त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यातील अनुभवाविषयी बिगुलला पत्र लिहावे जेणेकरून देशातील सर्व कामगारांना हे कळेल की त्यांच्या समस्या आणि मागण्या एकच आहेत, भलेही त्यांची जात-धर्म-देश काहीही असो.