Category Archives: स्त्री कामगार

शहराला चमकवणाऱ्या कामगार कष्टकऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश कधी?

पुण्यातील अप्पर इंदिरा नगर, शहराच्या कडेचा भाग. अर्थातच मध्यवर्ती शहराला स्वच्छ, चकचकीत ठेवणारे, श्रीमंतांसाठी फ्लॅट्स बांधणारे, त्यांच्या गाड्या बनवणारे, त्यांच्या घरात घरकामासाठी स्वस्तात राबणारे कामगार राहतात त्या वस्त्या.

दिल्ली अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा झुंझार लढा चालूच

दिल्लीच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन इतिहासाच्या पानांवर कोरले जात आहे. ह्या संघर्षातून जगभरातील कामगार आंदोलने प्रेरणा घेत आहेत

आपल्या वाट्याचे आकाश परत मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे ?

सावित्री-फातिमाचे स्वप्न जपत, सावित्री-फातिमा यांच्या क्रांतिकारी मैत्रीच्या वारशाचे स्वतःला मशाल वाहक मानणारी ‘स्त्री मुक्ती लीग’ भांडवली चौकटीला आह्वान देत स्त्री-मुक्तीच्या स्वप्नाकडे वाटचाल करत आहे.

दिल्लीच्या अंगणवाडी स्वयंसेविकांचा ऐतिहासिक संप

दिल्ली स्टेट अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स युनियनच्या नेतृत्वात दिल्लीचे 22,000 अंगणवाडी कामगार पगारवाढ, सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा इत्यादी मागण्यांसाठी दिल्लीच्या कानाकोपऱ्यातील 11,000 अंगणवाडी केंद्रांना टाळे ठोकून सिव्हिल लाईन्स येथे संपावर बसल्या होत्या. गेला महिनाभर चाललेल्या ह्या झुंजार संघर्षाने देशातल्या सर्वच मुख्य राजकीय शक्तींचे पितळ कामगारांसमोर उघडे पाडले आहे.

स्त्री कामगारांचा संघर्ष श्रमाच्या मुक्तीच्या महान संघर्षाचा हिस्सा आहे !

आजवर झालेली प्रगती जरी संतोषजनक असली, आणि कामगार संघटनांनी जी प्रगती केली आहे ती उल्लेखनीय जरी असली तरी महिला आजही खूप मागे आहेत, आणि अनेक वर्षांच्या मेहनतीतुन मिळवलेले परिणाम अत्यंत कमी आहेत ह्या सत्यापासून आपण आपली डोळेझाक करून घेऊ शकत नाही.

घरकामगार संघर्ष समितीतर्फे, पुण्यात 8 मार्च महिला दिनानिमित्त अभिवादन फेरी

8 मार्च रोजी आपल्या मागण्या घेऊन, आजही विविध प्रकारच्या गुलामीत दबलेल्या स्त्रिया स्त्रीमुक्तीच्या लढ्याला पुढे नेण्यासाठी दरवर्षी रस्त्यावर उतरतात. पुण्यातही घरकामगार संघर्ष समितीतर्फे 8 मार्च रोजी स्त्रीमुक्तीच्या लढ्यातील कार्यकर्त्यांना अभिवादन करत, स्त्रीमुक्तीचा निर्धार व्यक्त करत अभिवादन-फेरी आयोजित केली गेली.

घरकामगार महिलांसाठी कोरोना ठरला दुष्काळात तेरावा महिना

घरकाम करणार्‍या महिला प्रामुख्याने असंघटित क्षेत्रामध्ये येतात त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे कायदेशीर संरक्षण प्राप्त नाही. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अन्याय अत्याचार आणि छळाच्या विरोधात त्यांना कोणताही कायदेशीर दावा करता येत नाही. उलट मोठ्या प्रमाणामध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना कामचुकार, आळशी, बेईमान, बेजबाबदार अशाप्रकारे हिणवले जाते आणि अनेकदा तर चोरीचे आळही घेतले जातात.घरकाम करणाऱ्या महिलांना मिळणारी मजुरी अत्यंत कमी प्रमाणात मिळते किंवा नगण्य मिळते. कधी कधी तर मजुरी कमी मिळत असल्यामुळे नाईलाजाने ज्या ठिकाणी त्या काम करतात त्या ठिकाणचे शिळे अन्न, चप्पल जोड्या फाटके कपडे यावर आपला उदरनिर्वाह चालवावा लागतो.

लुधियाना मधील वर्धमान निशंभू गारमेंट कारखान्यातील महिला कामगारांची भयानक अवस्था

या महिला कामगारांकडे लुटमार आणि अन्यायाच्या विरोधात एकत्र येण्याशिवाय काही पर्याय नाहीये. आज लुधियाना असो किंवा इतर कोणतेही शहर, बघितले तर संपूर्ण भारतातच भांडवलदार ज्यांच्याकडे उत्पनाचे साधन आहे, ते पुरुष आणि महिला दोघांची पण श्रम शक्ती लुटत आहेत. आज कामगारांना हे समजून घ्यावे लागेल, मग तो पुरुष कामगार असो किंवा महिला कामगार, की त्यांची हि अवस्था बदलायला कोणी अवतार येणार नाही. त्यांना आपल्या हक्कांसाठी आपल्या संघटना बनवून, एकजूट होऊन, संघर्ष करावा लागेल.

हरियाणाच्या वीट भट्ट्यांमध्ये गुलामांप्रमाणे काम करणारे बिहारी कामगार

वीटभट्टीवर काम करणाऱ्या अनेक महिला रातांधळेपणाने ग्रस्त झाल्या आहेत आणि मुलांना कुपोषणामुळे चर्मरोग झाले आहेत. गर्भवती महिलांना सुद्धा सोडले जात नव्हते आणि त्यांच्याकडूनही काम करवले जात होते. त्यांना धमकी दिली जात होती की जर त्यांनी काम केले नाही तर त्यांच्या पोटावर लाथ मारून बाळाला मारले जाईल. इतके कठिण काम करूनही त्यांना मजुरी मिळत नव्हती.

बीडमध्ये उसतोडणी महिला कामगारांच्या गर्भाशयाचे सक्तीने ऑपरेशन!

एकूणच पितृसत्ताक व्यवस्थेत स्त्रीचे स्थान दुय्यम, त्यावर साखर कारखान्याच्यांच्या धंद्याच्या स्पर्धेमध्ये आणि भांडवली शेतीमध्ये कामगाराचे स्थान सर्वात खालच्या पातळीवर, त्यामुळे त्याचे कितीही शोषण होऊ शकते, आणि या सगळ्यात कहर म्हणजे देशात खाजगी डॉक्टरांवर कोणताही कायदेशीर धरबंध नाही त्यामुळे मिळाला बकरा की काप त्याला हीच प्रक्टिस. अशाप्रकारे ऊसतोडणी महिला कामगार या तिन्ही व्यवस्थांची बळी होत आहे.