Category Archives: प्रवासी कामगार

कोरोनाच्या सुलतानी संकटाविरोधात प्रवासी मजूर वर्गाचा संघर्ष सुरू

भारतामध्ये करोना महामारीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून फॅसिस्ट राज्यसत्तेने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर भारतातील प्रवासी मजुरांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. चुकीच्या पद्धतीने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे रोगापेक्षा इलाज भयंकर म्हणायची स्थिती व्हावी अशाप्रकारे भारतातील प्रवासी मजुरांना अनेक संकटांना मोठ्या तीव्रतेने सामोरे जावे लागले आहे. पण लॉकडाऊनमध्ये सरकारी दडपशाहीला न जुमानता सरकारी अनास्था आणि दमनाच्या विरोधात प्रवासी मजुरांचे स्वयंस्फूर्त संघर्ष सुद्धा मोठ्या प्रमाणात भारताच्या विविध राज्यांमध्ये निर्माण झाले आहेत.

गुजरातमधे उत्तरप्रदेश- बिहार मधील प्रवासी कामगारांवर हल्ले आणि प्रांतवाद

भारतात 1990च्या उदारीकरणाच्या धोरणानंतर संरचनात्मक-व्यवस्थात्मक संकट अजून गडद झाले आहे. ह्या प्रक्रियेत कामाचे खाजगीकरण, अनौपचारीकीकरण, कंत्राटीकरण, प्रासंगिकीकरण, आणि कामगारांचे विस्थापन, स्थलांतर, परिघीकरण अभूतपूर्व वाढले आहे. गरीब राष्ट्रांमध्ये सुद्धा अनौपचारिक-प्रचंड मेहनतीच्या, प्रचंड असुरक्षित कामात लागलेल्या कामगारांपैकी बहुसंख्य कामगार हे तुलनेने मागासलेल्या भागातून आलेले प्रवासी मजूर आहेत. भांडवलशाही प्रवासी मजूर आणि स्थलांतरांचा दुहेरी वापर करत आहे. पहिले तर प्रवासी कामगारांची वाढीव असुरक्षितता भांडवलदारांना जास्त शोषणाची संधी वाटते आणि श्रमाच्या शोषणा व्यतिरिक्त  भाषा, संस्कृती, प्रांतवादाच्या समस्यांना प्रवासी कामगारांना तोंड द्यावं लागतं. ‘बाहेरील’ या ओळखीच्या आधारावर भांडवलाला त्यांच्या विरोधात स्थानिक गरीब, कामगार, बेरोजगार, मध्यमवर्गात परकीयद्वेष आणि विस्थापित विरोधी मुलतत्ववाद पसरवता येतो व लोकांची बंधुघाती वैराकडे घेऊन जाणारी दिशाभूल करता येते. प्रवासी-स्थलांतरीत कामगार हे स्थानिक लोकांसाठी अशा प्रकारचे स्तोम बनते ज्यायोगे त्यांना स्वत:च्या भांडवलाकडून होणाऱ्या शोषणाबद्दल अंधत्व येते. गुजरात मधे झालेल्या कामगारांवरील हल्ल्यातून हेच आपल्या समोर येते. 

भारत असो किंवा सिंगापूर: कामगारांचे शोषण सगळीकडे सारखेच!

बिंदर कौर सिंगापूर मधे एका घरी घरकाम करतात. ‘मजदूर बिगुल’च्या त्या नियमित वाचक आहेत. शिक्षित असलेले असे बरेच कामगार आहेत जे वेगवेगळ्या जागी आज अतिशय कमी मजुरीवर काम करतात व ते राजकीयदृष्ट्या सजग आहेत. ते बिगुलला वेळोवेळी पत्र लिहून किंवा फोन करून त्यांचे विचार मांडतात. इतर कामगार वाचकांना सुद्धा आम्ही हे आवाहन करतो की त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यातील अनुभवाविषयी बिगुलला पत्र लिहावे जेणेकरून देशातील सर्व कामगारांना हे कळेल की त्यांच्या समस्या आणि मागण्या एकच आहेत, भलेही त्यांची जात-धर्म-देश काहीही असो.