Category Archives: कामगार वृत्तपत्र

वृत्तपत्र आणि कामगार – अन्तोनियो ग्राम्शी

कामगारांनी भांडवली वर्तमानपत्रासोबत कुठल्याही प्रकारची संलग्नता दृढपणे नाकारली पाहिजे. भांडवली वर्तमानपत्रे (मग त्याचा रंग कोणताही असो) त्यांचे स्वतःचे विचार व हित आणि त्यांच्या विरोधात काम करणारे विचार व हितसंबंध यांच्यामधील संघर्षातील एक उपकरण असते. ह्यात छापल्या जाणाऱ्या गोष्टी एकाच विचाराने प्रभावित झालेल्या असतात, व तो म्हणजे वर्चस्वशाली वर्गाची सेवा करणे, जो वेळप्रसंगी कामगार वर्गाच्या विरोधात रुपांतरित होतो. वास्तविक, भांडवली वर्तमानपत्राच्या प्रत्येक ओळीमध्ये हा पूर्वग्रह दिसून येतो.