Category Archives: वारसा

दु:खाच्या कारणांचा शोध घेणारा कलाकार : बर्टोल्ट ब्रेष्ट

“कला ही समाजाचा आरसा नाही तर समाज बदलण्यासाठी घाव घालणारा हातोडा आहे” ही त्याची कलेविषयक भुमिका होती आणि हीच भुमिका त्याच्या कवितांमधून आणि नाटकांमधून व्यक्त होते. अन्याय कधी अनंतकाळ टिकू शकत नाही. अपप्रचार आणि जनतेमध्ये असलेले सत्ताधारी वर्गाचे वर्चस्व अनंत काळ चालू शकत नाही, जनता सुद्धा आपल्या जीवनातील वास्तव समोर ठेऊन या अपप्रचाराविरोधत आणि शोषणा विरोधात आवाज उचलेल, कधी ना कधी जनतेचे शोषण करणाऱ्या समाज व्यवस्थेचा नायनाट होईल, अशी आशा दाखवत, अंधाऱ्या काळात लढणाऱ्या युवकांसाठी, कार्यकर्त्यांसाठी, कामगार कष्टकऱ्यांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी बर्टोल्ट ब्रेष्ट नेहमीच एक प्रेरणास्तंभ बनून राहील.

शहीद चंद्रशेखर आझाद: भविष्यात होणाऱ्या नव्या भारतीय समाजवादी क्रांतीचे प्रेरणास्रोत!

मानवी शोषणाचा अंत, समानता, वर्गविहीन समाज या कल्पना आणि समाजवादाने आझाद प्रेरित झालेले होते. त्याकाळी समाजवादावरील बहुतेक पुस्तके ही इंग्रजी भाषेत असायची,  हिंदी मध्ये उपलब्ध नव्हती. इंग्रजी भाषा, शिक्षण यांच्या मर्यादा असूनदेखील आझाद वैज्ञानिक समाजवाद समजून घेण्यासाठी आपल्या साथींकडून इंग्रजी पुस्तके वाचून,  हिंदीमध्ये त्याचा अनुवाद करून घेत, त्याचा अर्थ समजून घेत, त्यावर चर्चा करत.

मुळशी सत्याग्रह:  टाटा उद्योगाविरोधात विस्थापनविरोधी संघर्षाची कहाणी

ज्याच्या इतिहासाच्या अत्यंत कमी नोंदी सापडतात, असा मुळशी सत्याग्रह, पांडुरंग महादेव (सेनापती) बापट आणि वि. म. भुस्कुटे यांच्या नेतॄत्वात 1920च्या दशकात लढला गेला. विजनिर्मितीसाठी टाटा हायड्रोलिक कंपनी (आताचे नाव टाटा पावर) निला व मुळा नदीवर धरण बांधू पहात होती, ज्यामुळे मुळशीतील 52 गावे पाण्याखाली जाणार होती. जनतेने ब्रिटीशांनी टाटांसोबत मिळून घेतललेल्या हुकूमशाही निर्णयाविरोधात संघर्षाचा निर्णय घेतला.

14 मार्च, कार्ल मार्क्स यांच्या 140 व्या स्मृतिदिनानिमित्त

जगाला कामगारांच्या सत्ता स्थापनेचं एक उदात्त, महत्तम स्वप्न, एक घनगंभीर लक्ष्य देणारा आणि तिथपर्यंत पोहचण्यासाठी एक विज्ञाननिष्ठ रस्ता दाखवणारा व्यक्ती म्हणजे कार्ल मार्क्स! आज जगभरात कामगार वर्गीय बाजू निवडणारी, कष्टकऱ्यांची श्रम संस्कृती स्वतःत रुजविण्याचा प्रयत्न करणारी प्रत्येक व्यक्ती घट्ट मूठ वळून, पाठीचा कणा ताठ करून, हात वर उचलून तितक्याच जिद्दीने एक नारा देते जितक्या जिद्दीने मार्क्स हा नारा देत असे – ‘जगातील कामगारांनो एक व्हा!’

महान ऑक्टोबर सर्वहारा क्रांतीचा वारसा अमर रहे!

25 ऑक्टोबर (क्रांत्योत्तर नवीन कॅलेंडर नुसार 7 नोव्हेंबर) 1917 रोजी लेनिनच्या नेतृत्वाखालील बोल्शेविक पक्षाच्या पुढाकाराने रशियातील कामगार वर्गाने भांडवलदार वर्गाची सत्ता उलथवून टाकली आणि 1871 च्या पॅरिस कम्युन नंतर पुन्हा कामगार वर्गीय सत्तेची स्थापना केली. या घटनेने ना फक्त रशियाच्या इतिहासाला नवीन वळण दिले, तर जगाच्या इतिहासावर कायमची अमिट छाप सोडली आणि इतिहासाच्या संपूर्ण कालक्रमालाच कलाटणी दिली. ऑक्टोबर क्रांतीच्या तोफगोळ्यांचे आवाज जगभर घुमले.

22 ऑक्टोबर, क्रांतिकारी अश्फाकउल्ला खान यांच्या जन्मदिनानिमित्त

अश्फाकउल्ला खान यांना आज फक्त एका क्रांतिकारकाच्या रूपात, ज्याने भारतीय स्वातंत्र लढ्यात स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले म्हणून आठवले जाते. परंतु त्यांच्या राजकीय आणि विचारधारात्मक प्रवासाबद्दल समाजाच्या बहुसंख्य हिश्श्याला कमीच माहिती आहे. बहुसंख्य जनता आजही अश्फाक उल्लाह खान यांच्या क्रांतिकारी राजकारणासोबत परिचित नाही.

28ऑगस्ट, महान जातीविरोधी योद्धे अय्यंकालींच्या जन्मदिनानिमित्त

अय्यंकाली केरळमधील जातिअंताच्या लढाईतले महत्त्वाचे नेते होते ज्यांनी  ब्राह्मणवादाविरुद्ध आणि त्याला पोसणाऱ्या सामंतवाद, ब्रिटीश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. यासाठी त्यांनी सरकारला अर्ज, विनंत्या केल्या नाहीत तर जनतेच्या सामूहिक ताकदीवर विश्वास ठेवून क्रांतिकारी लढे उभे केले. यात ते यशस्वी सुद्धा झाले. त्यांनी दाखवून दिले की शोषित जनता फक्त लढू शकते असे नाही तर जिंकू सुद्धा शकते.

शहीद चंद्रशेखर आझाद आणि शहीद शिवराम राजगुरू यांच्या जन्मदिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

आज खऱ्या अर्थाने सर्वहारा वर्गाला संघटीत करायचे असेल तर जुन्या समाजव्यवस्थेवर आधारित अप्रासंगिक धार्मिक सणांच्या जागी जनतेच्या नायकांचे जन्मदिन-शहीददिन, जनतेने लढलेल्या योग्य लढाया हे सामुहिक सण म्हणून स्थापित करावे लागतील. भगतसिंहाने सांगितल्याप्रमाणे क्रांतीचा संदेश गिरण्या-कारखान्यांची क्षेत्रे, शहरातील बकाल वस्त्या आणि खेड्यातील जीर्ण झोपड्यांमध्ये राहणाऱ्या कोट्यवधी लोकांमध्ये पोहोचवून त्यांच्यात क्रांतीची चेतना जागवावी लागेल.

11 ऑगस्ट, क्रांतिकारी खुदिराम बोस यांच्या शहादत दिना निमित्त

11 ऑगस्ट म्हणजे खुदिराम बोस यांचा शहादत दिवस. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या क्रांतिकारकाला इंग्रजांनी फासावर लटकवले. कोण होते खुदिराम बोस आणि काय आहे त्यांचा वारसा?

जालियनवाला बाग नूतनीकरणाच्या नावाने इतिहासाचे विकृतीकरण

इतिहासकार इरफान हबीब यांनी जालियनवाला बाग स्मारकाच्या ह्या नव्या रूपाला इतिहास आणि ऐतिहासिक वारश्याच्या किमतीवर करण्यात आलेले कंपनीकरण म्हटले आहे. डॅनिश-ब्रिटिश इतिहासकार किम वॅगनर, जे वसाहतकालीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक आहेत, यांनी ह्या ‘सौंदर्यीकरणा’ बाबत मांडले की जालियनवाला बाग हत्याकांडाचे शेवटचे अवशेष प्रभावी पणे मिटवण्यात आले आहेत. येणारी पिढी हा इतिहास आहे तसा कधीच समजू शकणार नाही