सर्व कामगारांनी संघटित झाले पाहिजे
ज्या कारखान्या मध्ये मी काम करतो तिथे 25 ते 30 लोक काम करतात, ज्यापैकी 10 ते 12 महिला आहेत. इथे जवळच आणखी दोन कारखाने आहेत. या तीन कारखान्यांमध्ये मिळून जवळपास 350 कामगार काम करतात त्यात जवळपास 200 महिला कामगार आहेत. या कारखान्यांमध्ये स्टील पोलिशिंगचे अत्यंत धोकादायक काम चालते. स्टील लाइन मधली बहुतांश कामे तशीही अत्यंत धोकादायक असतात आणि कारखान्यांमध्ये दररोजच अपघात घडत असतात. अश्या अपघातानंतर कारखाना मालक कामगारांना किरकोळ उपचार उपलब्ध करतो, परंतु अशा अपघातांमध्ये त्यांना कधीही नुकसान भरपाई दिली जात नाही. अपघातानंतर कारखाना मालक कामगारांना कामावरून काढून सुद्धा टाकतात.