शहीद चंद्रशेखर आझाद: भविष्यात होणाऱ्या नव्या भारतीय समाजवादी क्रांतीचे प्रेरणास्रोत!
मानवी शोषणाचा अंत, समानता, वर्गविहीन समाज या कल्पना आणि समाजवादाने आझाद प्रेरित झालेले होते. त्याकाळी समाजवादावरील बहुतेक पुस्तके ही इंग्रजी भाषेत असायची, हिंदी मध्ये उपलब्ध नव्हती. इंग्रजी भाषा, शिक्षण यांच्या मर्यादा असूनदेखील आझाद वैज्ञानिक समाजवाद समजून घेण्यासाठी आपल्या साथींकडून इंग्रजी पुस्तके वाचून, हिंदीमध्ये त्याचा अनुवाद करून घेत, त्याचा अर्थ समजून घेत, त्यावर चर्चा करत.