वृत्तपत्रे आणि कामगारवर्ग
कामगारांचा मोठा हिस्सा हे समजत नाही की ही वृत्तपत्रे आज मुख्यत्वे मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, बिल्डर, उद्योगपती, व्यापारी अशा भांडवलदारांनी दिलेल्या जाहिरातींच्या पैशावर वा त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर चालतात आणि म्हणूनच ती कामगारवर्गाच्या बाजूचे विचार वा सत्य मांडत तर नाहीतच शिवाय रोज प्रस्थापित भांडवली व्यवस्था कशी चांगली याबद्दलचा विचार कणाकणाने झिरपवण्याचे काम करतात