Tag Archives: दिल्ली

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या झुंझार संघर्षासमोर झुकले केजरीवाल सरकार!

दिल्लीमध्ये ‘आई-सी-डी-इस स्कीम’च्या माध्यमातून काम करत असलेल्या अंगणवाडी सेविका व हेल्पर्सच्या २३ दिवस चाललेल्या झुंझार संघर्षासमोर केजरीवाल सरकारने गुडघे टेकले आहेत. आपल्या मागण्यांसाठी ७ दिवस अनिश्चितकालीन उपोषणास बसलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सर्व तात्कालिक मागण्या विनाअट मान्य करणे केजरीवाल सरकारला भाग पडले आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हा विजय ‘दिल्ली स्टेट अंगणवाडी वर्कर्स एंड हेल्पर्स यूनियन’च्या नेतृत्वाखाली मिळाला आहे.