Tag Archives: माकप

‘माकप’ची २१वी कॉंग्रेस – संशोधनवादी गटारगंगेत उतरून कामगार वर्गाशी विश्वासघाताची निर्लज्ज कसरत

ह्या कॉंग्रेसच्या दरम्यान पारित झालेल्या राजकीय-रणकौशलात्मक दिशेबद्दलच्या रिपोर्ट वरून नजर जरी फिरवली तरी लक्षात येते की येणाऱ्या दिवसांमध्ये ‘माकप’ कामगार वर्गाशी विश्वासघाताचे स्वतःचेच जुने विक्रम मोडीस काढण्यास सज्ज झाली आहे. ही रिपोर्ट मागील अडीच दशकांमधील पक्षाच्या राजकीय-रणकौशलात्मक दिशेबद्दल टीकात्मक चिकित्सा करण्याचा दावा करते जेणे करून येणाऱ्या काळासाठी अधिक योग्य राजकीय-रणकौशलात्मक दिशा ठरवता येईल. पण ह्यात आत्म-चिकित्सेच्या ऐवजी केवळ शाब्दिक बुडबुडे फोडण्यात आले आहेत आणि संसदीय गटारगंगेत स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीचे केविलवाणे प्रयत्न उठून दिसत आहेत.