Tag Archives: मानखुर्द

स्‍वच्‍छता अभियानाचे देशव्‍यापी नाटक सुरु असतानाच सार्वजनिक स्‍वच्‍छतागृह खचून लोकांचा मृत्‍यू

सत्‍तेवर आल्‍यापासूनच मोदी सरकार सातत्‍याने स्‍वच्‍छता अभियानाची दवंडी पिटवीत आहे. हाथामधे झाडू घेऊन फोटो काढण्‍यापासून टी.व्‍ही., वर्तमानपत्रे, रेडिओवर अमाप पैसे खर्च करून जाहीरातींमार्फत जागरूकता निर्माण करण्‍याच्‍या बाता मारल्‍या जात आहेत. परंतु वास्‍तविकत: स्‍वच्‍छ भारत निर्माण करण्‍यासाठी ज्‍या गोष्‍टींची अत्‍यंत आवश्‍यकता आहे, त्‍यावर काहीही खर्च केला जात नाही. मुंबईसारख्‍या महानगरामधे जेथील ६० टक्‍के लोकसंख्‍या झोपडपट्ट्यांमध्‍ये छोट्या-छोट्या खुराडयांत राहते, जी किमान मुलभूत सुविधांपासूनच वंचित आहे, तेथील सार्वजनिक स्‍वच्‍छतागृहांची अवस्‍था पाहूनच तिथल्‍या परिस्थितीविषयी अंदाज बांधता येऊ शकतो. सार्वजनिक स्‍वच्‍छतागृहांची याच गंभीर परिस्थितीचा परिणाम नजिकच्‍या काळातच मुंबईत झालेल्‍या अनेक लोकांच्‍या मृत्‍यूच्‍या रूपाने समोर आला आहे.