समाजवादाची मुळाक्षरे (भाग – १)
अमेरिकेतील एक समाजवादी लिओ ह्यूबरमॅन यांनी लिहिलेली ही पुस्तिका भांडवलशाहीचे वेगवेगळे पैलू आणि समाजवाद म्हणजे काय हे अतिशय साध्या सोप्या शब्दांमध्ये समजावते. ही पुस्तिका १९६७ मध्ये प्रकाशित झाली होती आणि प्रामुख्याने अमेरिकेतील कामगारांना डोळ्यांसमोर ठेवून ती लिहिण्यात आली होती. बहुतके आकडेवारीसुद्धा अमेरिकेतील आहे. परंतु ही पुस्तिका जेवढी अमेरिकेतील कामगारांसाठी प्रासंगिक आहे तेवढीच भारतातील कामगारांसाठीसुद्धा.