लव्ह जिहादचे षडयंत्र हाणून पाडले!
28 मे रोजी दिल्लीमध्ये शाहबाद डेअरी येथे 16 वर्षीय साक्षी एका बर्थडे पार्टीला जात असताना तिचा पूर्वीचा मित्र साहिलने रस्ता अडवून तिची हत्या केली. 28 मे ला ही घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संघ भाजपच्या विविध संघटना म्हणजे आरएसएस, बजरंग दल मिळून घटनेला धार्मिक वळण देण्यासाठी खोटा प्रचार घेऊन वस्तीत आले. साहिल मुस्लिम धर्मातून येत होता आणि साक्षी हिंदू, म्हणून हे लव जिहादचे प्रकरण होतं, ह्याप्रकारचं धार्मिक विष पेरत उजव्या संघटना सक्रिय झाल्या. त्यावेळेस भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाच्या (आर.डब्ल्यु.पी.आय.) नेतृत्वात स्थानिक जनतेनेच या प्रकरणात साहिलला शिक्षा तर झालीच पाहिजे, परंतु अशा घटना अगोदरही होत आल्यात, आणि इथे धर्माचा काही संबंध नाही ही भुमिका घेत धर्मांध प्रचारकांना हाकलून लावले.