Tag Archives: सुदेश जाधव

डिलिव्हरी कामगारांच्या निर्दय शोषणावर उभा आहे ई कॉमर्सचा धंदा

हे कामगार दररोज सुमारे चाळीस किलोचा माल पाठीवर बांधून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवसभर मोटरसायकलने फिरत असतात. मध्यवर्गीय इमारतींमध्ये बऱ्याचदा त्यांना लिफ्टमधून जायचीदेखील परवानगी नाकारली जाते. त्यामुळे हे ओझे पायऱ्यांवरून चढून वर न्यावे लागते व उतरावे लागते. जीव तोडून केलेल्या या कष्टांचा परिणाम म्हणजे काही महिन्यांतच हे कामगार पाठीचे दुखणे, मान दुखणे, स्लीप डिस्क, स्पॉन्डिलाईटिस यांसारख्या आजारांच्या विळख्यात सापडतात. दिल्लीमधील सफदरजंग इस्पितळातील स्पोर्ट्स इंज्युरी सेंटरच्या डॉक्टरांच्या मते दर दिवशी त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंटपैकी एक-दोन पेशंट हे कोणत्यातरी ऑनलाईन शॉपिंग कंपनीचे कामगार असतात. कंत्राटी पद्धतीमुळे त्यांना कोणत्याही सुविधादेखील पुरविल्या जात नाहीत. वेळेत माल पोहोचवण्याच्या घाईत अपघात होण्याची शक्यताही असतेच. अशा अपघातांच्या प्रसंगीदेखील त्यांना कंपन्यांकडून कोणतीही मदत दिली जात नाही, वा उपचाराचा खर्च करण्याची जबाबदारीसुद्धा कंपन्या घेत नाहीत.