भगतसिंह जे म्हणाले ते आजही प्रासंगिक आहे!
समाजाचे प्रमुख अंग असूनही आज कामगारांना त्यांरच्या प्राथमिक हक्कांपासून वंचित ठेवले जाते. शोषण करणारे भांडवलदार त्यांच्या निढळाच्या कमाईतून निर्माण होणारी सर्व संपत्ती हडपून टाकतात. दुसऱ्याचे अन्नदाते असणारे शेतकरी आज त्यांच्या कुटुंबासह एकेका दाण्यासाठी मोताद बनले आहेत. जगभरच्या बाजारपेठांसाठी कपडे उपलब्ध करून देणाऱ्या विणकऱ्याला आपले व पोराबाळांचे शरीर झाकण्याइतकेदेखील कापड मिळत नाही. सुंदर महाल निर्माण करणारे गवंडी, लोहार, सुतार स्वत: मात्र घाणेरड्या वस्त्यांत राहून आपली जीवनयात्रा समाप्त करतात. या विपरित समाजातील शोषक भांडवलदार त्यांच्या छोट्यामोठ्या लहरींखातर लाखो-कोट्यावधींची उधळपट्टी करतात.
(बाँब खटल्यातील दिल्ली सेशन कोर्टात भगतसिंह व बटुकेश्वर दत्त यांनी दिलेली ऐतिहासिक जबानी)
आम्ही हे सांगू इच्छितो की युद्ध पेटले आहे, आणि जोपर्यंत मूठभर बलवान बांडगुळे स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी, भारतातील मोलमजुरी करणाऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या निसर्गदत्त साधनांचे शोषण व लूट करत राहतील, तोपर्यंत हे युद्ध चालू राहील- मग ते शुद्ध ब्रिटिश भांडवलदार असोत किंवा ब्रिटिश-भारतीय असोत किंवा केवळ हिंदुस्थानी (भांडवलदार) असोत. हे कावेबाज शोषण, ते मिश्र वा शुद्ध भारतीय स्वरूपाच्या नोकरशाही यंत्रणेच्या माध्यमातून पार पाडोत, त्यामुळे परिस्थितीत काहीही फरक पडत नाही.
फासावर लटकवले जाण्यापूर्वी तीन दिवस ला फासावर चढवण्यापेक्षा बंदुकीच्या गोळ्यांनी उडवावे अशी मागणी करताना भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यां तरफे पंजाबच्या गव्हर्नरला लिहिला गेला पत्रचा एक अंश
कामगार बिगुल, ऑगस्ट २०१५