“गुजरात मॉडल” चा खूनी चेहरा: सूरत चा कापड उद्योग की कामगारांचा कत्तलखाना?

मजदूर बिगुल प्रतिनिधी

गुजरातेतील सुरत शहर हे कापड उद्योगाचे मोठे केंद्र असून येथे हजारोंच्या संख्येने मजूर  काम करतात. देशभरातील इतर औद्योगिक क्षेत्रांप्रमाणेच येथेसुद्धा मजूर लोक भयानक असुरक्षित परिस्थितीत काम करतात. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका शोध अभ्यासात सुरत मधील कापड उद्योगात 2012 ते 2015 या सालात झालेल्या 84 घातक दुर्घटनांचा विस्तृत लेखाजोखा दिलेला दिलेला आहे ज्यामधे कमीत कमी कमी 114 कामगारांचा मृत्यू झालेला आहे. औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय कडून आरटीआय मार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्या कालावधीदरम्यान 375 पेक्षा अधिक कामगारांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्यात. रिपोर्टनुसार बऱ्याच कारखान्यांमध्ये ईएसआय (एम्प्लॉयमेंट स्टेट इन्शुरन्स) योजना योग्य स्वरूपात लागू केल्या जात नाही त्यामुळे खूप सारे विमा असलेले कामगार अपंग असून सुद्धा हक्काच्या सहाय्या पासून वंचित राहतात. बरेच सारे कामगार तर ईएसआई सुविधेपासुनच वंचित आहेत

विजय प्रधान, वय 45, सुरतमधील सिंथेटिक कापड उद्योगातील 12 यंत्रमागांवर काम करताना. फोटो श्रेय: थॉमसन रुटर्स

गुजरातच्या अलंग बंदर बाबत आता बऱ्याच लोकांना माहित आहे की तिथे जुन्या जहाजांना तोडण्याचे काम  करणारे कामगार नेहमी दुर्घटना आणि बिमाऱ्यांना बळी पडतात. “सुरत मधील कापड उद्योगात कामगारांची परिस्थिती” या शिर्षका खाली आता प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टमुळे गुजरातेतील एका आणखी प्रमुख उद्योगाचा भयानक चेहरा समोर येत आहे. वडोदरा स्थित ‘पीपल्स ट्रेनिंग अँड रिसर्च सेन्टर’ चे जगदीश पटेल यांनी तयार केलेली ही रिपोर्ट सांगते की ही आकडेवारी पूर्ण वास्तव सांगण्यास असमर्थ आहे कारण खूप सारे कारखाण्यांची तर नोंदणीच नाही आणि त्यामुळे त्याची आकडेवारी सरकारी विभागाजवळ नाही. ह्या संस्थेने वृत्तपत्रांच्या कात्रणांची पडताळणी करून दाखवून दिले की सुरत मध्ये कापड उद्योगात 2012 ते 15 दरम्यान 121 कामगारांचा मृत्यू झाला व 126 कामगार गंभीर स्वरूपात जखमी झाले. परंतु रिपोर्ट हे पण सांगते की कारखान्यात कामावर झालेल्या सगळ्याच अपघातांची व मृत्यूची दखल वृत्तपत्रे घेत नाहीत व ते जनतेपर्यंत पोहोचत नाहीत कारण बरेच कारखाने नोंदणी झालेले नाहीत आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांचा काही लेखाजोखा नाही.

ही काही नवीन बाब नाही. कुठल्याही क्षेत्रात काम करणारा कामगार किंवा कामगार कार्यकर्ता ही बाब जाणतो. काही वर्षांआधी दिल्लीच्या बादली औद्योगिक क्षेत्रात  बिगुल कामगार दस्ता द्वारे आरटीआय अंतर्गत उद्योग विभाग, श्रम विभाग आणि दिल्ली पोलीस यांना ही माहिती मागितली की मागील तीन महिन्यात येथल्या कारखान्यात किती दुर्घटना झाल्या आणि त्यात जखमी व मृत्यू झालेल्या कामगारांची संख्या किती आहे. उद्योग विभाग आणि श्रम विभागा जवळ कुठलीही माहिती उपलब्ध नव्हती. दिल्ली पोलिसांनी सांगितले की त्या कालावधीत कुठल्याही कामगाराचा मृत्यू झालेला नाही आणि चार कामगार जखमी झाले. मजदूर दस्ताने स्वतः तीन महिन्यात कमीत कमी सहा कामगारांचा मृत्यू नाव व पत्या सहीत नोंदवला होता.

रिपोर्ट सांगते की वर्ष प्रतिवर्षी अशा मोठ्या दुर्घटना होत राहतात तरीसुद्धा सरकारी विभाग याकडे पूर्णपणे डोळेझाक करीत आहे. रिपोर्ट नुसार सुरत मध्ये 1991-95 सालात 100 घातक दुर्घटना घडल्या. नंतर 2007 आणि 2008 मध्ये क्रमशा 40 आणि 36 दुर्घटनांची नोंद झाली परंतु त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी कुठलाही ठोस उपाय केला गेला नाही. उलट नियम-कायदे धाब्यावर बसवून काम करणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढत गेली आहे.

रिपोर्ट नुसार ही आकडेवारी सुरतच्या कापड उद्योगांमधील कामांतर्गत आरोग्य व सुरक्षेची परिस्थिती खूप चिंताजनक असल्याचे आपल्याला दाखवून देते. दुर्घटनांच्या कारणांवरून नजर टाकली तर 2012 व 15 च्या दरम्यान झालेल्या 121 घातक दुर्घटनांपैकी 30 जळण्याच्या कारणामुळे झाल्यात आणि 27 दुर्घटना विजेचा करंट लागल्यामुळे झाल्या. 23 दुर्घटनांचे कारण ‘दोन पृष्ठभागांमध्ये दबल्यामुळे’ असे सांगितले गेले.  कारखान्यांच्या आतील परिस्थितीचा जाणकार कोणीही व्यक्ती याचा अर्थ समजू शकतो. याव्यतिरिक्त बरेच मृत्यू श्वास कोंडणे, उंचावरून पडणे, आग व विस्फोट, मशीन मध्ये फसणे, गॅस इत्यादी कारणांमुळे झालेत. बऱ्याच दुर्घटना जिवावर बेततात याचे कारण कारखान्याच्या  परिस्थितीशी संबंधित आहे. रिपोर्ट मध्ये दिलेल्या एका उदाहरणावरून आपल्याला हे समजू शकते. सुरत येथील सूर्यफूल इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये अश्विनीकुमार रोड वरील एका पावरलूम युनिट मध्ये 3 ऑक्टोबर 2015 रोजी 11:45 वाजता आग लागली. दुर्घटने दरम्यान बरेच कामगार बाहेर निघू शकले परंतु नीला नायक आणि कृष्णा लिंम्जा नावाचे दोन कामगार दुसऱ्या मजल्यावर अडकले. फायर ब्रिगेड जोपर्यंत दोघांना बाहेर काढले तोपर्यंत महिला कामगाराची श्वास कोंडल्यामुळे मृत्यू झाला होता. रिपोर्ट सांगते “आग दुसऱ्या मजल्यावर सुरू होऊन तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. मशीने अशा पद्धतीने ठेवल्या गेली होती की 2 मशिनांमध्ये अजिबात जागा उरलेली नव्हती आणि चालण्याचे रस्ते पूर्णपणे छोटे होते. रस्त्यातच कच्चामाल व तयार माल यांचे बंडल सुद्धा लावून ठेवण्यात आले होते. कारखान्यात 200 कामगार होते. तळमजल्यावरचे कामगार तर बाहेर पडू शकले परंतु दोन व तीन मजल्यावरचे कामगार अडकून पडले.”

रिपोर्ट हे पण सांगते की बऱ्याच मामल्यांमध्ये मृतांच्या नातेवाईकांना किंवा जखमी झालेल्या कामगारांना एकतर भरपाई मिळत नाही किंवा मिळाली तरी फार कमी मिळते. रिपोर्टमध्ये अजय राजू यादव ( वय 18 वर्ष) याचे उदाहरण आहे ज्याच्यासोबत सुरत मधील एम्ब्रॉयडरी युनिट मध्ये काम करताना दुर्घटना झाली. मशीन मध्ये कपडे लावताना प्रेस मशीन च्या रोल मध्ये त्याचा डावा हात फसला व त्याची तीन बोटे कापली व एक बोट निकामी झाले. रिपोर्ट सांगते की वैद्यकीय विशेषज्ञांनी त्याचे अपंगत्व 47टक्के सांगितले परंतु त्याला काहीही भरपाई मिळाली नाही. युनिट इएसआई कायद्यांतर्गत नोंदणी झालेले होते परंतु त्या कामगाराला इएसआय कार्डच दिल्या गेले नव्हते. एका कामगार संघटनेकडून दोन वर्षे चालवलेल्या कानूनी कारवाईनंतर स्थानिक कोर्टाने अजयला 2 लाख 88 हजार 685 रुपये भरपाई आणि 86,625 रुपये दंड भरपाई देण्याचा आदेश दिला. मालकाने त्या कामगाराला कामावरून काढून टाकले. मागील पाच वर्षापासून त्या मामल्याची सूनवाई अजूनही चालूच आहे आणि अजयला एक पैशाची पण भरपाई मिळाली नाही. सुरत मधील कामगार वस्त्यांमध्ये तुम्हाला अशा बऱ्याच घटनांबद्दल ऐकायला मिळेल.

अनुवाद : जयवर्धन

 

कामगार बिगुल, जुलै 2018