पॅरिस कम्युन: पहिल्या मजूर राज्याची सचित्र कथा (पुष्प आठवे)

आज भारतातच नाही, तर संपूर्ण दुनियेत कामगार भांडवली लुटखोरांच्या वेगवान होत चाललेल्या हल्ल्यांचा सामना करत आहेत, आणि कामगार आंदोलन विखुरलेपण, साचलेपणा, आणि हताशेने ग्रासलेले आहे. अशामध्ये इतिहासाची पाने उलटून कामगार वर्गाच्या गौरवशाली संघर्षांपासून शिकण्याचे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे महत्व फार वाढते. आजपासून 150 वर्षे अगोदर, 18 मार्च 1871 ला फ्रांसची राजधानी पॅरिस मध्ये पहिल्यांदा कामगारांनी आपले शासन कायम केले. याला पॅरिस कम्युन म्हटले गेले. त्यांनी शोषकांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या या विचारांना ध्वस्त केले की कामगार राज्यकारभार चालवू शकत नाहीत. पॅरिसच्या बहादूर कामगारांनी फक्त भांडवली सत्तेच्या रथालाच उलटवले नाही तर 72 दिवसांच्या शासनाच्या दरम्यान येणाऱ्या दिवसांचे एक छोटे मॉडेल जगासमोर प्रस्तुत केले आणि दाखवले की समाजवादी समाजामध्ये भेदभाव, असमानता, आणि शोषण कशाप्रकारे समाप्त केले जाईल. पुढे चालून 1917 च्या रशियन कामगार क्रांतीने या क्रांतीचा पुढचा टप्पा रचला.

कामगार वर्गाच्या या साहसी कारवाईने फक्त फ्रांसमधीलच नाही तर जगातील भांडवलदारांचे काळीज थरथरले. त्यांनी कामगारांच्या पहिल्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी जीवतोड प्रयत्न केले आणि शेवटी कामगारांच्या कम्युनला त्यांनी रक्ताच्या नद्यांमध्ये न्हाऊन काढले. पण कम्युनचे सिद्धांत अमर झाले.

पॅरिस कम्युनच्या पराजयातूनसुद्धा जगातील कामगार वर्गाने महत्वाचे धडे घेतले. पॅरिसच्या कामगारांचे बलिदान कामगार वर्गाला सतत आठवण देत राहील की भांडवलशाहीला नष्ट केल्याशिवाय त्यांना मुक्ती मिळू शकत नाही.

पॅरिस कम्युनला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘कामगार बिगुल’ च्या या अंकापासून आम्ही जगातील पहिल्या कामगार राज्याच्या सचित्र कथेची सुरूवात करत आहोत. ‘मजदूर बिगुल’ मध्ये मार्च 2012 पासून प्रकाशित झालेल्या धारावाहिक कथेचा अनुवाद पुढील अंकांमध्ये आम्ही देत राहू.

आज भारतातच नाही, तर संपूर्ण दुनियेत कामगार भांडवली लुटखोरांच्या वेगवान होत चाललेल्या हल्ल्यांचा सामना करत आहेत, आणि कामगार आंदोलन विखुरलेपण, साचलेपणा, आणि हताशेने ग्रासलेले आहे. अशामध्ये इतिहासाची पाने उलटून कामगार वर्गाच्या गौरवशाली संघर्षांपासून शिकण्याचे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे महत्व फार वाढते. आजपासून 150 वर्षे अगोदर, 18 मार्च 1871 ला फ्रांसची राजधानी पॅरिस मध्ये पहिल्यांदा कामगारांनी आपले शासन कायम केले. याला पॅरिस कम्युन म्हटले गेले. त्यांनी शोषकांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या या विचारांना ध्वस्त केले की कामगार राज्यकारभार चालवू शकत नाहीत. पॅरिसच्या बहादूर कामगारांनी फक्त भांडवली सत्तेच्या रथालाच उलटवले नाही तर 72 दिवसांच्या शासनाच्या दरम्यान येणाऱ्या दिवसांचे एक छोटे मॉडेल जगासमोर प्रस्तुत केले आणि दाखवले की समाजवादी समाजामध्ये भेदभाव, असमानता, आणि शोषण कशाप्रकारे समाप्त केले जाईल. पुढे चालून 1917 च्या रशियन कामगार क्रांतीने या क्रांतीचा पुढचा टप्पा रचला.

कामगार वर्गाच्या या साहसी कारवाईने फक्त फ्रांसमधीलच नाही तर जगातील भांडवलदारांचे काळीज थरथरले. त्यांनी कामगारांच्या पहिल्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी जीवतोड प्रयत्न केले आणि शेवटी कामगारांच्या कम्युनला त्यांनी रक्ताच्या नद्यांमध्ये न्हाऊन काढले. पण कम्युनचे सिद्धांत अमर झाले.

पॅरिस कम्युनच्या पराजयातूनसुद्धा जगातील कामगार वर्गाने महत्वाचे धडे घेतले. पॅरिसच्या कामगारांचे बलिदान कामगार वर्गाला सतत आठवण देत राहील की भांडवलशाहीला नष्ट केल्याशिवाय त्यांना मुक्ती मिळू शकत नाही.

पॅरिस कम्युनला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘कामगार बिगुल’ च्या मार्च 2021 अंकापासून आम्ही जगातील पहिल्या कामगार राज्याच्या सचित्र कथेची सुरूवात केली आहे. ‘मजदूर बिगुल’ मध्ये मार्च 2012 पासून प्रकाशित झालेल्या धारावाहिक कथेचा अनुवाद पुढील अंकांमध्ये आम्ही देत राहू.

या साखळीतील पहिल्या काही पुष्पांमध्ये आपण पॅरिस कम्युनच्या पार्श्वभूमीमध्ये जाणून घेतले की कामगारांनी कशाप्रकारे भांडवलाच्या सत्तेविरोधात लढण्याची सुरूवात केली आणि कशाप्रकारे चार्टीस्ट आंदोलन आणि 1848 च्या क्रांत्यांमधून जात कामगार वर्गाची  चेतना आणि संघटितपणा वाढत गेला. आपण कामगारांच्या मुक्तीच्या वैज्ञानिक विचारधारेचा विकास आणि कामगारांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय संघटनेबद्दल (इंटरनॅशनलबद्दल) जाणले. गेल्या अंकात आपण पाहिले की कम्युनची स्थापना कशाप्रकारे झाली आणि तिच्या रक्षणाकरिता कामगार वर्गीय जनता कशाप्रकारे शौर्याने लढली. आपण हे देखील पाहिले की कम्युनने खऱ्या लोकशाहीच्या नियमांना इतिहासात पहिल्यांदा व्यवहारात कसे लागू केले आणि हे दाखवले कीजनतेची सत्ताखरोखर काय असते. आता आपण त्या चुकांवर नजर टाकूयात ज्यांच्यामुळे कम्युनचा पराजय झाला. या चुकांना योग्य रितीने समजणे आणि भांडवलशाही विरोधात निर्णायक लढाईत विजयासाठी त्यातून धडे घेणे कामगारवर्गासाठी अत्यंत आवश्यक आहे.


— संपादक मंडळ

कम्युनने शिकवले – भांडवलशाही विरोधातील लढाईत उदारता, शिथिलपणा, आणि धाकधुक यांचा परिणाम म्हणजे रक्तरंजित पराभव.

पॅरिसचे वीर कम्युनार्ड बहादुरीने लढत होते परंतु शेवटी त्यांना भांडवलशाहीच्या एकत्रित शक्तीपुढे हार मानावी लागली. फ़्रांसच नाही तर संपूर्ण युरोपचे भांडवलदार कामगारांच्या या राज्याला धुळीत मिळवण्यासाठी एकजूट आणि उतावीळ झाले होते. कम्युनार्डांच्या जबरदस्त लढाईमुळे ते भयभीत झाले होते परंतु धूर्त शिकाऱ्या प्रमाणे ते कामगारांच्या चुकांची ते वाट बघत होते आणि कोणत्याही चुकीचा फायदा घेण्यासाठी एकही संधी ते सोडत नव्हते. आणि धैर्याने लढूनही कम्युनच्या रक्षकांनी त्यांना त्याची ताकद एकवटण्यासाठी आणि हल्ला करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. या गोष्टीला नीट समजून घेण्याची आणि त्यापासून शिकण्याची गरज आहे. चित्र: शत्रूकडून हिसकावलेल्या एका तोफेसोबत पॅरिसच्या कामगारांची एक संरक्षण फळी

  1. कम्युनच्या बरबादीचे कारण हे होते की, कम्युनच्या स्थापनेच्या वेळी आणि नतंर दोन्ही वेळेला शिस्तबद्ध, संगटित क्रांतिकारी नेतृत्वाचा अभाव होता. कामगार वर्गाचा कोणताही एकताबद्ध आणि विचारधारात्मक रूपाने मजबुत राजकीय पक्ष नव्हता जो जनतेच्या या प्रारंभिक उठावाचे नेतृत्व करेल. नेतृत्वासाठी काही गटामध्ये स्पर्धा झाली, ज्यांमध्ये प्रुधोंवादी, ब्लांकीस्ट आणि आंतराष्ट्रीयवादी हे गट सगळ्यात जास्त लोकाचे प्रतिनिधित्व करत होते.त्यामुळे कम्युन मध्ये सतत भ्रमाची आणि अनिर्णयाची स्थिती राहिली, योजना आणि दूरदृष्टीचा अभाव राहिला. डावपेचांचा अभाव आणि जोमाने वाढणाऱ्या क्रांतिकारी परिस्थितीमध्ये सुद्धा दैनंदिन पद्धतीने काम करणे या नेत्यांची सवय बनलेली होती.
  2. . कम्युनच्या सुरवातीच्या उठावाच्या काळात जो काही थोडासा प्राधिकार (अथोरिटी) होता, तो सुद्धा त्यांनी नंतर सोडून दिला. जसे की, 12 एप्रिल 1871 मध्ये मार्क्सने आपला मित्र कुगलमन याला लिहिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले होते की, “नॅशनल गार्ड)च्या केंद्रीय समितीने आपली पकड खूप लवकर सोडून दिली आणि कम्युनला हस्तांतरीत केली.”. मार्क्स जे केंद्रियतावादाचे पुरस्कर्ता होते, ही गोष्ट समजून चुकले होते की कामगार सेनेला आपल्या अधिकारात एकत्रित ठेवणाऱ्या केंद्रिकृत क्रांतिकारी अथोरिटीच्या नेतृत्वामध्येच थियेर सरकारच्या विरूद्ध एक यशस्वी राजकीय संघर्ष चालवला जाऊ शकत होता. नॅशनल गार्डच्या केद्रिंय समितीचा असाच प्राधिकार होता; परंतु आपल्या शक्तींना तिलाजंली देवून आणि आपला अधिकार ढिल्या-ढाल्या पद्धतीने संघटित कम्युनला हस्तातंरित करून त्यांनी आपल्या सशस्त्र सेनेच्या क्रांतिकारी उर्जेला विखरून टाकले.
  3. असे असतानाही, कम्युनच्या कमतरतेचे विश्लेषण करण्यासोबतच, मार्क्सने कम्युनार्डांच्या क्रांतिकारी जोशाबद्दल जबरदस्त उत्साह दाखवला. वर आपण कुगलेमान यांना लिहिलेल्या ज्या पत्राचा उल्लेख केला आहे, ते कम्युनच्या घोषणे नतंर तीन आठवड्यानी लिहिले होते. पत्रामध्ये मार्क्सने उत्कट उत्साहाने लिहिले होते की “काय नैपुण्य! या पॅरिसवासियानी कसा ऐतिहासिक पुढाकार, आत्मोसार्गाचे कसे सामर्थ्य दाखवले आहे. सहा महिन्यांच्या भूक आणि बरबादी नंतर, जी विदेशी शत्रूपेक्षा आतील घातपात्यांमुळे जास्त होती, ते प्रशियाई बंदुकांच्या सावलीत अशा प्रकारे उठून उभे राहिले जणू काही फ्रांस आणि जर्मनीमध्ये युद्ध चालूच नव्हते, जसे काही पॅरिसच्या उबंरठ्यावर शत्रू उभाच नव्हता. इतिहासात अशा शौर्याचे कोणतेही उदाहरण नाही.”
    आणि त्यानतंर मार्क्सने त्या चुकीवर टिका केली जी कम्युनच्या सगळ्या चुकांमधील मोठी चूक होती. “जर त्यांचा पराजय झाला तर तो त्यांच्या उदार हृदयामुळे झाला असेल. ज्या क्षणी विनी आणि नॅशनल गार्ड्चा प्रतिक्रियावादी हिस्सा पॅरिसमधून पळाला, तसा त्यांनी व्हर्सायवर हल्ला केला पाहिजे होता. ‘प्रामाणिकपणापोटी’ हाती आलेली संधी गमावली. ते गृहयुद्ध सुरू करू इच्छित नव्हते – जणू काही नृशंस थियेरने पॅरिसला निशस्त्र करण्याच्या प्रयत्नातून गृहयुद्धाची सुरवात केलीच नव्हती.”
  4. कामगारांच्या पॅरिसचे रक्षण करताना सक्रिय शूर स्त्री-पुरूष

    क्रांतिकारी रणनितीकार, मार्क्स, ही गोष्ट समजून चुकले होते की, जेव्हा पॅरिसचा शत्रू पळत होता तेव्हा नॅशनल गार्डची जबाबदारी होती की त्याला पुन्हा शक्ती एकत्रित करू न देता आणि पॅरिसच्या कामगारावर परत हल्ला करण्याची संधी न देता, थियेरच्य पराजित सेनेचा पाठलाग करून त्यांना नेस्तनाबूत केले पाहिजे होते. परंतु कम्युन ही गोष्ट समजू शकली नाही. कम्युनच्या नेत्यांच्या दयाळूपणामुळे ज्यावर मार्क्सने इतकी टीका केली आहे , थियेर सरकारला आणि त्याच्या प्रतिक्रियावादी समर्थकांना शांतपणे व्हर्सायला जाण्यासाठी आणि तेथे आपली ताकदीला पुन्हा संघटित करून कम्युनच्या विरोधात षंडयंत्र रचण्याची संधी दिली. याच उदारतेमुळे त्यांनी त्या प्रमुख बुर्झ्वा नेत्यांना बंदिवान बनवले नाही जे शहरातच राहिले होते आणि ज्यांनी घरभेद्यांच्या रूपाने काम करत प्रतिक्रांतिकारी घटनांचे केंद्र बनवण्यासाठी या संधीचा फ़ायदा घेतला. परंतु जर कम्युनने या सैनिकी गटांकडून, जे प्रतिक्रियावादी सरकारच्या प्रभावाखाली होते, हत्यारं काढून घेतली असती आणि त्यांना शहरातच रोखून धरले असते तर त्यांच्यापैकी एका मोठ्या गटाला आपल्या बाजूला वळवता आले असते आणि दुसऱ्यांना तटस्थ ठेवता आले असते. त्या ऐवजी त्यांना मुक्तपणे व्हर्सायला जाण्याची आणि तेथे प्रतिक्रियावादी सैन्याच्या सतत संरक्षणात राहण्याची संधी दिली गेली.

  5. .

    व्हर्सायच्या सत्तेने अटक केलेल्या कम्युनार्डांसोबत जुलुम करण्यात कोणतीही कमतरता सोडली नाही. वरील फोटोत पकडलेल्या कम्युनार्ड स्त्री-पुरूषांना जेलमध्ये गोळी मारली जात आहे.

    पॅरिस कम्युन कामगार वर्गाचा सत्तेसाठीचा संघर्ष होता. संधर्षाच्या विकासासोबत पॅरिसच्या कामगारांनी जो बदल बघितला तो फक्त प्रशासनामध्ये बदल नव्हता. त्यांच्या नेत्यामध्ये सर्वाधिक स्पष्ट समजदारी असणारे लोक,आंतरराष्ट्रीयच्या सिद्धांतावर चालणारे लोक जाणून होते की हा संघर्ष क्रांतीचे रूप धारण करत आहे, परंतु ते आणि इतर लोक या संघर्षाला दिशा देणारे डावपेच बनवण्यात अपयशी राहिले. कुगेलमानला लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात(17 एप्रिल) मार्क्स ने खालील शब्दात आपली व्याख्या ठेवली होती. “पॅरिस कम्युनमुळेच हे शक्य झाले की भांडवलदार वर्ग आणि त्याच्या सत्तेच्या मशिनरी विरूद्ध संघर्षाने एका नव्या टप्प्यात प्रवेश केला. याचा अंत काहीही होवो, आंतराष्ट्रीय महत्वाची घटना एक घडून चुकली आहे.”
    पॅरिसच्या कामगाराना या संघर्षात उतरावे लागेल या मार्क्सच्या वक्तव्याबद्दल लेनिनने लिहिले की “मार्क्सला या गोष्टीची जाणीव होती की इतिहासात काही क्षण असे येतात की यशाची खात्री नसताना सुध्दा जनतेच्या भावी शिक्षणासाठी आणि पुढील संघर्षाच्या अभ्यासासाठी जनतेचा संघर्ष आवश्यक बनतो.”

  6. पॅरिसच्या प्रत्येक तुकड्यासाठी घनघोर युद्ध झाले. शेवटपर्यंत कम्युनार्डांनी शौर्याने प्रतिकार केला. शहरातील एका रस्त्यावरील लढाईचे दृष्य.

    चर्चला राज्यसत्तेपासून वेगळे करणे, चर्चच्या संपत्तीचे सत्तेद्वारे अधिग्रहण, उध्वस्त झालेल्या कंपन्या आपल्या ताब्यात घेणे, कामगारांवर दंड लावण्यासंबंधीचे सर्व नियम संपवणे, बेकरीमध्ये रात्रीच्या वेळी काम करण्यास बंदी घालणे या कम्युन व्दारे लागू केले गेलेले कायदे सामाजिकदृष्ट्या महत्वाची कामं होती. ती कामगारांच्या अशा सरकारची कामं होती जे कामगार हिताचे कायदे बनवत होते.
    परंतु कम्युनने सर्व कारखाने आपल्या ताब्यात घेतले नव्हते. त्यांनी बॅंक ऑफ फ्रांसला आपल्या ताब्यात घेतले नव्हते.उलट ते आपल्या क्रांतिकारी उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी बॅंकेकडे कर्ज मागायला गेले. बॅंकेला आपल्या ताब्यात ने घेणे ही कम्युनची अजून एक मोठी चूक होती. या धनाचा वापर कम्युनला चिरडण्यासाठी केला गेला.

    कम्युनला चिरडून टाकल्यानतंर हजारोच्या संख्येने कामकऱ्यांना पकडले गेले. अनेकांना मारून टाकले गेले आणि हजारोंना देशातून हाकलून दिले गेले.

    बुर्झ्वा सेनेने पॅरिसमध्ये घडवलेल्या बरबादीचा नजारा

    वर्सायच्या सेनेने पॅरिसवर ताबा मिळवल्यावर सगळीकडे अत्यंत क्रुर हत्याकांड चालवले. हाताच्या घट्ट्यावरून ओळखले जात होते की एखादा व्यक्ती कामगार आहे आणि त्याला गोळी घातली जात होती. चित्रात गोळ्या घातलेल्या कम्युनार्डांच्या शवपेट्या. ही दृश्य कधीच आमच्या स्मृतीतून ढळली नाही पाहिजेत.

  7. कम्युनने जरी राज्याची सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती, त्यांनी सत्तेच्या जुन्या साच्यातच राज्यकारभार चालवण्याचा प्रयत्न केला. मार्क्सने 1 एप्रिलच्या आपल्या पत्रात या विरूद्ध इशारा देत लिहिले होते की, “नोकरशाही राजकीय यंत्रणेला नष्ट करणे” ही कामगार क्रांतीची एक पूर्वशर्त होती. कम्युनच्या मुल्याकंनासंबंधी फ़्रांसमधील गृहयुद्ध या आपल्या क्लासिकल लिखाणात, जे कम्युनच्या पराजयानतंर दोन दिवसानी आंतरराष्ट्रीयच्या पहिल्या सर्वसाधारण परिषदेच्या बैठकीत संबोधनाच्या रूपात प्रस्तुत केले होते, मार्क्सने या विषयावर आपले लक्ष केंद्रीत केले आणि हा सैद्धांतिक निष्कर्ष सादर केला, “कामगार वर्ग कार्यरत असलेल्या सत्तेच्या यंत्रणेला जसेच्या तसे हातात घेवू शकत नाही आणि आपला उद्देश साध्य करण्यासाठी तिचा वापर करू शकत नाही.”
  8. पॅरिसमध्ये आपली शेवटची लढाई लढताना कम्युनार्ड.

    1891 मध्ये कम्युनच्या 20व्या वर्षपूर्ती निमित्त एंगेल्सने फ़्रांसमध्ये गृहयुद्ध लेखाच्या नव्या जर्मन आवृत्तीची भूमिका लिहिली. बॅंक ऑफ़ फ्रांसला आपल्या ताब्यात न घेण्याची व आपल्या हितामध्ये वापर न करण्याची टीका करत एंगेल्स हे रेखांकित करतात की कम्युनने सत्तेची जुनी यंत्रणा नष्ट न करता तिचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मार्क्सने आपल्या ‘संबोधनात’ ज्या गोष्टीची चर्चा केली होती, त्याच गोष्टीवर भर देत एंगेल्स म्हणतात की, “कम्युनला हे समजले पाहिजे होते की, सत्तेवर ताबा मिळवल्यानंतर कामगार राज्यसत्तेच्या त्या जुन्या मशिनरीला वारून शासन करू शकत नव्हते, ज्या यंत्रणेव्दारे कामगारांचे शोषण केले जात होते.” एंगेल्स या निष्कर्षाला जाऊन पोहोचले की “राजेशाही प्रमाणेच कोणत्याही लोकशाही गणतंत्रामध्ये सुद्धा राज्यसत्ता ही एका वर्गाद्वारे दुसऱ्या वर्गाच्या छळवणुकीच्या साधनाशिवाय काहीच नसते

    पॅरिसमध्ये आपली शेवटची लढाई लढताना कम्युनार्ड.

    .”

    कम्युनच्या पराजयानंतर कामगारांकडून हिसकावलेली हत्यारे नष्ट करताना व्हर्सायचे सैनिक.