पॅरिस कम्युन: पहिल्या मजूर राज्याची सचित्र कथा (बारावे आणि अंतिम पुष्प )

आज भारतातच नाही, तर संपूर्ण दुनियेत कामगार भांडवली लुटखोरांच्या वेगवान होत चाललेल्या हल्ल्यांचा सामना करत आहेत, आणि कामगार आंदोलन विखुरलेपण, साचलेपणा, आणि हताशेने ग्रासलेले आहे. अशामध्ये इतिहासाची पाने उलटून कामगार वर्गाच्या गौरवशाली संघर्षांपासून शिकण्याचे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे महत्व फार वाढते. आजपासून 150 वर्षे अगोदर, 18 मार्च 1871 ला फ्रांसची राजधानी पॅरिस मध्ये पहिल्यांदा कामगारांनी आपले शासन कायम केले. याला पॅरिस कम्युन म्हटले गेले. त्यांनी शोषकांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या या विचारांना ध्वस्त केले की कामगार राज्यकारभार चालवू शकत नाहीत. पॅरिसच्या बहादूर कामगारांनी फक्त भांडवली सत्तेच्या रथालाच उलटवले नाही तर 72 दिवसांच्या शासनाच्या दरम्यान येणाऱ्या दिवसांचे एक छोटे मॉडेल जगासमोर प्रस्तुत केले आणि दाखवले की समाजवादी समाजामध्ये भेदभाव, असमानता, आणि शोषण कशाप्रकारे समाप्त केले जाईल. पुढे चालून 1917 च्या रशियन कामगार क्रांतीने या क्रांतीचा पुढचा टप्पा रचला.
कामगार वर्गाच्या या साहसी कारवाईने फक्त फ्रांसमधीलच नाही तर जगातील भांडवलदारांचे काळीज थरथरले. त्यांनी कामगारांच्या पहिल्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी जीवतोड प्रयत्न केले आणि शेवटी कामगारांच्या कम्युनला त्यांनी रक्ताच्या नद्यांमध्ये न्हाऊन काढले. पण कम्युनचे सिद्धांत अमर झाले.
पॅरिस कम्युनच्या पराजयातूनसुद्धा जगातील कामगार वर्गाने महत्वाचे धडे घेतले. पॅरिसच्या कामगारांचे बलिदान कामगार वर्गाला सतत आठवण देत राहील की भांडवलशाहीला नष्ट केल्याशिवाय त्यांना मुक्ती मिळू शकत नाही.
पॅरिस कम्युनला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘कामगार बिगुल’ च्या मार्च 2021 अंकापासून आम्ही जगातील पहिल्या कामगार राज्याच्या सचित्र कथेची सुरूवात केली. ‘मजदूर बिगुल’ मध्ये मार्च 2012 पासून प्रकाशित झालेल्या धारावाहिक कथेचा अनुवाद आम्ही गेल्या 11 अंकांमध्ये प्रसिद्ध केला. 12 व्या पुष्पाद्वारे या मालिकेचा शेवट करत आहोत.
या लेखमालेतील सुरूवातीच्या काही पुष्पांमध्ये आपण पॅरिस कम्युनच्या पार्श्वभूमीमध्ये जाणले की भांडवलाच्या सत्तेविरोधात कामगारांचा संघर्ष कशाप्रकारे पावलोपावली विकसित झाला. आपण पाहिले की कम्युनची स्थापना कशी झाली आणि तिच्या रक्षणासाठी कामकरी जनता कशाप्रकारे शौर्याने लढली. आपण हे सुद्धा पाहिले की कम्युनने खऱ्या लोकशाहीच्या तत्वांना इतिहासात पहिल्यांदा लागू कसे केले आणि हे पण दाखवले की “जनतेची सत्ता” वास्तवात कशी अस्ते. गेल्या काही पुष्पांमध्ये आपण हे पाहिले की कम्युनचा पराजय कोणत्या कारणांमुळे झाला. या चूकांना नीट समजणे आणि भांडवलशाहीच्या विरोधात निर्णायक लढाईत त्यांच्यापासून धडे घेणे कामगार वर्गासाठी अत्यंत आवश्यक आहे.

— संपादक मंडळ

कम्युनच्या शिक्षणाच्या प्रकाशात कामगारांचा मुक्ती संघर्ष विजयी होईल

  1. कम्युनच्या लाल झेंड्याच्या नेतृत्वात पॅरिसच्या झुंझार कामगारांनी बॅरिकेडच्या लढाईत भांडवलदाराच्या फौजेचा हिमतीने मुकाबला केला.

    मागील अंकात आपण कामगार वर्गाच्या इतिहासातील सगळ्यात प्रेरणादायी गाथेबाबत जाणून घेतले. कशा प्रकारे फ्रांसमध्ये नेपोलियन तृतीय यांने द्वितीय-साम्राज्याच्या कोलमडलेल्या शासनात थोडा जीव टाकण्याचा प्रयत्न करताना जुलै 1870 मध्ये प्रशियाविरूध्द युद्धाची घोषणा केली; कशा वाईट पद्धतीने तो युद्ध हारला आणि प्रशियाच्या सेनेसमोर पॅरिसला अरक्षित सोडले; कशाप्रकारे सप्टेंबर 1870 मध्ये एका भांडवली-गणतंत्राची घोषणा केली गेली आणि तथाकथित “संरक्षण सरकारची” स्थापना झाली; कशाप्रकारे शत्रूने घेरलेल्या शहरासोबत या सरकारने दगाबाजी केली आणि मग पॅरिसची जनता उठून उभी राहिली व आपल्या बचावासाठी स्वत: हत्यारबंद झाली; कशाप्रकारे जेव्हा सरकारने त्यांच्या नॅशनल गार्डला (रक्षक दलाला) निशस्त्र करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पॅरिसच्या जनतेने 18 मार्चला कम्युनची घोषणा केली आणि शहराच्या शासनाला आपल्या हातात घेतले; कशाप्रकारे गद्दार थियेरचे सरकार व्हर्सायला पळून गेले, आणि तेथे प्रशिया सोबत मिळून कम्युनला उखडून टाकण्याची योजना बनवली; आणि कशाप्रकारे पॅरिसच्या कामगारांनी 72 दिवस आपले राज्य कायम राखले आणि आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत त्यांनी कम्युनचे रक्षण केले. जेव्हा व्हर्सायची सेना शहरात घुसली, तिने अनेक हजार स्त्री-पुरूषांना ठार मारले—त्यांना, ज्यांनी राजधानीच्या शासनावर ताबा मिळवण्याची आणि शोषित-वंचित लोकांच्या हितामध्ये शासन संचालित करण्याची हिंमत केली होती.

  2. कम्युनच्या घोषनेनंतर कम्युनच्या सरकारच्या रक्षणात ठामपणे उभा राहिलेला हत्यारबंद कामगारांची फळी.

    जेथे कुठे कामगार या बहादुरीच्या सघंर्षाची कहाणी पुन्हा एकदा ऐकायला जमा होतील, एक अशी कहाणी जी सुरुवातीपासूनच कामगारांच्या शौर्यगाथेच्या मौल्यवान वारशात सामिल झाली आहे, ते 1871 च्या शहीद झालेल्या कामगारांच्या स्मृती गर्वाने आठवतील. आणि सोबतच ते आजच्या वर्ग संघर्षाच्या त्या शहीदांची सुद्धा आठवण काढतील, ज्यांना मारून टाकण्यात आले आहे किंवा जे भांडवली देशांच्या तुरुंगात यातना भोगत आहेत, कारण त्यांनी आपल्या शोषकांविरूद्ध बंड करण्याची  हिंमत दाखवली, तशीच जशी पॅरिसच्या कामगारानी 150 वर्ष अगोदर केली होती.

  3. ज्या वेळी पॅरिसचे कामगार आपल्या वर्गशत्रूशी लढत होते आणि एका नव्या समाजाची रचना करत होते, त्यावेळी मार्क्स सतत या ऐतिहासिक घटनाक्रमावर लक्ष ठेवून होते आणि कामगारांना सल्ला देत होते.

    कार्ल मार्क्सच्या शब्दात “स्वर्गावर धाव घेण्यासाठी तयार” असे जे कम्युनार्ड होते, त्यांच्या शौर्यापासूनच फक्त कामगार प्रेरणा घेणार नाहीत! तर ते कम्युनच्या कथेतील मिळकतीं सोबतच तिच्या त्या चुका आणि कमतरतांना सुद्धा तपासतील  ज्यांच्यामुळे  पॅरिसच्या कामगारांना एवढी मोठी किंमत मोजावी लागली होती.

  4. कम्युनने आंतरराष्ट्रीय कामगारवर्गाला खूप धडे दिले. कामगार वर्गाच्या मार्क्स, लेनिन, एंगल्स या नेत्यांनी कम्युनच्या अनुभवाचा खोलवर अभ्यास केला आणि रशियन कामगारांनी कामगारांचे राज्य मजबुतीने स्थापन करून हे दाखवून दिले की त्यांनी पहिल्या कामगार क्रांतीच्या शिकवणीला चांगले समजून घेतले होते. त्यानंतर जगातील अनेक देशात कामगारांच्या नेतृत्वात कामकरी जनतेचे शासन प्रस्थापित झाले आणि जगातून शोषण व असमानता नष्ट करण्याच्या दिशेने मोठी पावले टाकली गेली. या सर्वात पॅरिस कम्युनची मशाल त्यांना रस्ता दाखवत होती. “स्वर्गाचे मालक” असणाऱ्या शोषकांनी आपल्या जुन्या दुनियेला वाचवण्यासाठी पूर्णपणे जोर लावला आणि कामगार वर्गाच्या आत घुसलेल्या गद्दारांनी त्यांना पूर्णपणे मदत केली. नव्या दुनियेला रचण्याच्या अथक प्रयत्नांमध्ये कामगार वर्गाच्या नेत्यांकडूनही काही चुका झाल्या. आज जगाच्या स्तरावर पाहिले तर मानव मुक्तीच्या लढाईत कामगार सेनेला जिंकलेले मोर्चे हरवून माघार घ्यावी लागली आहे. परंतु या पराजयापासून धडा घेवून कामगार वर्ग पून्हा एकदा उठून उभा राहिल आणि या वेळी भांडवलशाही- साम्राज्यवादाला नेहमीसाठी कबरेत झोपवूनच थांबेल हे नक्की.
  5. कम्युन फ्रेंच कामगार वर्गाची महान परंपरा आहे. पेरे लाशेज येथील चुप्प-भिंती (जेथे कम्युनार्डांना गोळ्या घातल्या होत्या) फ्रेंच कामगारांना त्यांच्या कामगार पूर्वजांच्या शौर्याची आठवण करून देतात, जे वेतनी-गुलामीच्या विरोधात संघर्षात उतरले होते. कम्युन संपूर्ण कामगार वर्गाचा वारसा सुद्धा आहे. ही पहिली अशी क्रांती होती, जिच्यामध्ये कामगारांनी फक्त संघर्ष नाही केला तर त्याला नियंत्रित पण केले आणि कामगारवर्गीय उद्दिष्टाच्या बाजूने दिशा दिली.

    कम्युनच्या 40 व्या स्मृतीदिनी 1921 मध्ये रशियन क्रांतीचे नेते लेनिन यांनी लिहिले, “आधुनिक समाजात कामगारवर्ग, ज्याला भांडवलाद्वारे आर्थिक स्वरूपात गुलाम बनवले गेले आहे, तोपर्यंत राजकीयरित्या शासन करू शकत नाही, जोपर्यंत तो आपल्या त्या बेड्या तोडत नाही ज्या त्याला भांडवलशाहीशी बांधतात. म्हणूनच कम्युनने समाजवादाच्या दिशेने पुढे जायला हवे होते, म्हणजेच कम्युनने भांडवलदार वर्गाच्या शासनाला, भांडवलाच्या शासनाला, उखडून फेकून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते आणि अस्तित्वात असलेल्या सामाजिक व्यवस्थेच्या  पायालाच ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता.” 1917 मध्ये रशियन कामगारांनी सोवियत कम्युनची स्थापना केली,  तेव्हा त्यांच्या जवळ अधिक अनुकुल वस्तुगत परिस्थिती सोबत नेतृत्व देण्यासाठी कामगार वर्गाची एक अशी सशक्त पार्टी होती, जी पॅरिसच्या कामगारांजवळ नव्हती.

  6. पहिल्या इंटरनॅशनलच्या सभेमध्ये पॅरिस कम्युनबद्दल अहवाल सादर करताना कार्ल मार्क्स.

    पॅरिस कम्युन क्रांतिकारी कामगार वर्गाची युगप्रवर्तक मिळकत आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघाच्या(पहिले इंटरनॅशनल) आपल्या ऐतिहासिक “संबोधन” च्या शेवटी कार्ल मार्क्सचे हे शब्द होते: “कामगारांचे पॅरिस आणि त्यांच्या कम्युनला नव्या समाजाच्या गौरवपूर्ण अग्रदुताच्या स्वरूपात नेहमी लक्षात ठेवले जाईल. कम्युनच्या शहीदांनी कामगार वर्गाच्या हृदयात आपले कायमस्वरूपी स्थान बनवले आहे. कम्युनचा संहार करणाऱ्यांना इतिहासाने नेहमीकरिता आरोपीच्या पिंजऱ्यात असे उभे केले आहे की त्यांच्या पुरोहितांनी कितीही प्रार्थना केली तरी त्यांना सोडवण्यात ते अयशस्वी राहतील.”