१ मे आंतराष्ट्रीय कामगार दिन
जगातील कामगारांनो एक व्हा!
मुक्तीचा मार्ग धरावा लागेल, शोषणाविरुद्ध लढावे लागेल
भांडवलशाहीशी लढून, स्वप्नांना संकल्पात उतरावे लागेल
आज घोषणा करने का दिन
हम भी है इंसान हमे चाहिये बेहतर दुनिया
करते है ऐलान
घृणित दासता किसी रूप में
नही हमे स्वीकार
मुक्ति हमारा अमिट स्वप्न है
मुक्ति हमारा गान
आपण १ मे आंतराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करतो. ह्या दिवसाचा इतिहास खूप रोचक आहे. ज्या संघर्षामुळे मे दिवसाचा जन्म झाला तो अमेरिकेत १८८४ मध्ये कामाचे तास ८ करा या आंदोलनाने सुरु झाला. या आंदोलनात कामगारांनी घोषणा दिली कि, आठ तास काम, आठ तास आराम, आठ तास मनोरंजन ह्या आंदोलना अगोदर तेथील कामगारांची हालत खूप बिकट होती. त्यांना १६-१६, १८-१८ तास राबवं लागत होत. फक्त कामगारच काय तर लहान मुले, स्त्रिया यांना सुद्धा जनावरासारखं राबवं लागत होते. शिकागो येथील कामगारांना अस जनावरासारखं राबणं मंजूर नव्हते म्हणून त्यांनी आठ तासाचा कार्य दिवस ही घोषणा दिली. १८७७-१८८६ च्या दरम्यान ह्या आंदोलनासाठी स्वतःला संघठीत करण्याचे काम केले. शिकागो येथील हे कामगार आंदोलन खूपच मजबूत होते. १ मे या दिवशी शिकागो येथील लाखो कामगार रस्त्यावर उतरले आणि आठ तास काम, आठ तास आराम, आठ तास मनोरंजन या घोषणेने सारे शिकागो पेटून उठले. काळ्या आणि गोऱ्या च्या नावाखाली कामगारांमध्ये फुट पडण्याचे भांडवलदारांचे कारस्थान कामगारांनी आपल्या वर्ग एकतेच्या दमावर असफल करून टाकले. म्हणून भांडवलदरांनी सुद्धा हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न केला. कामगारांच्या जन सभेवर भाड्याच्या गुंडांच्या मदतीने भ्याड हल्ला केला. त्यात ६ कामगार मरण पावले. या हल्ल्याच्या विरोधात कामगारांनी ‘हे मार्केट’ नावाच्या बाजरात विरोध प्रदर्शन केले. इथे सुद्धा कामगारांवर पोलसांनी हल्ला केला. तसेच भांडवलदारांनी आंदोलनकर्त्यांवर बॉम्ब टाकला. या मध्ये सुद्धा काही पोलीस आणि कामगार मरण पावले. आणि उलट. कामगार नेत्यांवरच खोटे खटले भरून त्यांना जेल मध्ये डांबले. त्यातील ४ नेत्यांना फासावर लटकावले गेले. अशा पद्धतीने या महान संघर्षाला चीरडवले गेले. त्याला रक्ताच्या दलदलीत बुडवले गेले. परंतु ज्या ठिणगीला शिकागोच्या कामगारांनी भडकावले होते तिने सगळ्या जगात आग पसरवली. आठ तासाच्या कामाची मागणी संपूर्ण जगातील कामगारांची मागणी झाली. शेवटी कामगारांनी ही मागणी संघर्ष करून जिंकली. जगभरातील भांडवलदारी शासनाला कायद्याने ८ तासाचा कार्य दिवस करण्यास मजबूर व्हावे लागले. पुढे १ मे हा दिवस आंतराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ओळखला गेला.
आपले हक्क मिळविण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संघर्ष केला आहे व करत आहे. त्याला कधी यश आले तर कधी अपयश आले पण कामगार अविरत संघर्ष करत राहिला. आज सुद्धा करतोय. का करतोय कामगार संघर्ष? उत्तर साध सोपे आहे. सुई पासून जहाजापर्यंत कामगार वस्तू बनवतो. तो रस्ते बनवतो, मोठ मोठे महाल बनवतो, विमान, ट्रेन बनवतो अर्थात सगळ्या वस्तू कामगार निर्माण करतो. भगतसिंह च्या शब्दात सांगायचे झाले तर समाजाचे प्रमुख अंग असूनही आज कामगारांना त्याच्या प्राथमिक हक्कापासून वंचित ठेवले जाते. शोषण करणारे भांडवलदार त्यांच्या निढळाच्या कमाईतून निर्माण होणारी सर्व संपत्ती हडपून टाकतात. दुसऱ्याचे अन्नदाते असणारे शेतकरी आज त्यांच्या कुटुंबासह एकेका दाण्यासाठी मोताद बनले आहेत. जगभरच्या बाजारपेठांसाठी कपडे उपलब्ध करून देणाऱ्या विनकाऱ्याला आपले व पोराबाळांचे शरीर झाकण्या इतके देखील कापड मिळत नाही. सुंदर महाल निर्माण करणारे गवंडी, लोहार, सुतार स्वतः मात्र घाणेरड्या वस्त्यांत राहून आपली जीवनयात्रा समाप्त करतात. या विपरीत समाजातील शोषक भांडवलदार त्यांच्या छोट्यामोठ्या लहारीनखातर लाखो-कोट्यावधींची उधळपट्टी करतात. आज ही भगत सिंहाचे हे शब्द प्रासंगिक आहेत. कामगार वरकरणी स्वतंत्र भासतो पण प्रत्यक्षात मात्र तो भांडवलदारांचा मोलमाजुरीचा गुलामच असतो. म्हणून आज कामगार, गरीब कष्टकरी जनता बकाल झोपडपट्ट्यांमध्ये राहण्यास हतबल झाली आहे.
अन् दुसरीकडे मात्र देशातल्या वरच्या १ टक्के लोकांकडे देशाच्या एकूण संपत्तीचा ५८.४ टक्के हिस्सा केंद्रित झालाय तर वरच्या १० टक्के लोकसंख्येकडे हा आकडा ८०.७ टक्के पर्यंत पोहचलाय. देशातील जवळजवळ ८० कोटी पेक्षा जास्त औद्योगिक व शेतात काम करणारे कामगार तसेच गरीब शेतकरी दिवस-रात्र काबाडकष्ट करून देखील भुकेशी आणि कांगालीशी झगडत आहेत. देशात ५९ कोटी कामगार ठेकेदारी पद्धतीवर राबत आहेत.जरी नियम आठ तास काम करण्याचा असला तरी देखील आजही अनेक कामगारांकडून १२-१२,१४-१४ तास काम करून घेतले जातेय. आज देशातील सफाई कामगारांची हलत बघितल्यावर अंगावर काटा येतो. बहुतेक सफाई कामगारांना ठेकेदारी पद्धतीवर कामावर घेतले जाते.त्यामुळे ठेकेदार त्यांचे आर्थिक शोषण तर करतोच. पण सफाईसाठी कामगारांना लागणारे साहित्य उदा.मास्क, हात मोजे, गम बूट इ.सुरक्षा साहित्य सुद्धा पुरविले जात नाही. तसेच अनेक कामगारांना किमान वेतन देखील दिले जात नाही. हे काम करणाऱ्या कामगारांमध्ये वर्षाला ३५० कामगार मृर्त्युमुखी पडतात. नफ्या तोट्याच्या बाजारात कामगारांच्या जीवनाला काडीची देखील किंमत नसते.
सध्याच्या परिस्थितीत देशभरात अनेक ठिकाणी कामगारांची आंदोलने सुरु आहेत. आणि ही आंदोलने चिरडण्यासाठी मोदी सरकार अगदी निर्दयीपणे कामगारांविरोधात कटकारस्थान करत आहे. त्याचाच परिपाक म्हणजे मारुतीच्या कामगारांच्या केसचा निर्णय. अच्छे दिनाचे कोलीत घेऊन आलेले मोदी सरकार सत्तेत आल्यापासून कामगारांविरुद्ध काळे कायदे आणत आहे. हरियाना सरकारच्या मंत्र्याने नुकतीच घोषणा केलीय की ते ह्या वर्षी कामगार दिन साजरा करणार नाही. त्या ऐवजी विश्वकर्मा जयंती साजरी केली जाईल. कारण विश्वकर्माने सांगितले होते कि काम हीच पूजा आहे. पण खरी गोष्ट ही आहे की ‘मे दिवस’ संघर्षाची प्रेरणा देतो आणि विश्वकर्मा जयंती कामगारांना आपले कर्म करण्याची प्रेरणा देते. यावरूनच लक्षात येतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखे फासीवाद्यांचे स्वप्नच आहे की कामगारांनी आपले होणारे शोषण चुपचाप सहन करावे. असल्या फालतू गोष्टी सांगून आपल्याला ह्या लोकांनी खूप गंडवले आहे. गेल्या ७० वर्षापासून आपण रोटी, कपडा, मकान ह्यातच अडकलोय. ह्या व्यवस्थेत कोणतेही सरकार आले तरी कामगार वर्गाचे भले काही होणार नाही. कारण निवडणुका भांडवलदारांच्या पैशावर लढवल्या जातात आणि भांडवलदारच कामगारांचे शोषण करत असतो.आज जगभरात सगळीकडेच आर्थिक हालत खराब असल्यामुळे कट्टर उजव्या फासीवादी विचारांच्या शक्त्या सत्तेत येत आहेत.आपल्या देशात सुद्धा तीच गत आहे. म्हणून आपल्यासारख्या गरीब, कष्टकरी-कामगार जनतेला भांडवलधारी सत्ताधाऱ्यांचे कांगावे ओळखावे लागतील. आपल्याला जात-पात, धर्माच्या नावाखाली लढवत ठेवून स्वतःची पोळी भजण्याचे काम सुरु आहे. मूठभर इंग्रजांनी सुद्धा अशाच पद्धतीनं आपल्या देशावर राज्य केलं. आता मूठभर भांडवलदार त्याच पद्धतीनं आपल्यावर राज्य करीत आहेत त्यासाठी आपण सगळे भेदभाव सोडून वर्ग एकजुटीने ‘मे दिना’ची प्रेरणा घेऊन एका सुंदर जगाचं स्वप्न बघुयात जिथे माणूस माणसाचे शोषण करणार नाही, राष्ट्र राष्ट्राचे शोषण करणार नाही. असा समाज घडविण्यासाठी संकल्प करून कामाला लागुयात. जगातील कामगारांनो तुमच्याजवळ तुमच्या हातापायातील शृंखलांखेरीज गमाविण्यासारखे काहीसुद्धा नाही. जिंकायला तर सारे जगच तुमचे आहे.
क्रांतिकारी अभिवादनासह
बिगुल मजदूर दस्ता
नौजवान भारत सभा
मुबई संपर्क: शहीद भगतसिंह पुस्तकालय, 103, 61-ए, लल्लूभाई कम्पाउण्ड, मानखुर्द (पश्चिम),
फ़ोन: – ९६१९०३९७९३, ९८१९६७२८०१
अहमदनगर संपर्क : शहीद भगतसिंह पुस्तकालय, सिद्धार्थनगर, गुगळे क्लिनिकच्या पाठीमागे, अहमदनगर
सम्पर्क : ९१५६८२४७०६, ८८८८३५०३३३, ७०५८१९७७२९, ९१५६३२३९७६
फेसबुक पेज : www.facebook.com/kamgarbigul वेबसाइट : www.marathi.mazdoorbigul.net