136वा कामगार दिन देशभरात क्रांतिकारी कामगारवर्गाकडून साजरा
आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त मे दिवसाचा वारसा स्मरून देशभरात क्रांतिकारी कामगार संघटनांनी कामगारांच्या एकजुटीचे प्रदर्शन करत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त मे दिवसाचा वारसा स्मरून देशभरात क्रांतिकारी कामगार संघटनांनी कामगारांच्या एकजुटीचे प्रदर्शन करत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
आपण १ मे आंतराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करतो. ह्या दिवसाचा इतिहास खूप रोचक आहे. ज्या संघर्षामुळे मे दिवसाचा जन्म झाला तो अमेरिकेत १८८४ मध्ये कामाचे तास ८ करा या आंदोलनाने सुरु झाला. या आंदोलनात कामगारांनी घोषणा दिली कि, आठ तास काम, आठ तास आराम, आठ तास मनोरंजन ह्या आंदोलना अगोदर तेथील कामगारांची हालत खूप बिकट होती. त्यांना १६-१६, १८-१८ तास राबवं लागत होत. फक्त कामगारच काय तर लहान मुले, स्त्रिया यांना सुद्धा जनावरासारखं राबवं लागत होते. शिकागो येथील कामगारांना अस जनावरासारखं राबणं मंजूर नव्हते म्हणून त्यांनी आठ तासाचा कार्य दिवस ही घोषणा दिली. १८७७-१८८६ च्या दरम्यान ह्या आंदोलनासाठी स्वतःला संघठीत करण्याचे काम केले.