महाविद्रोही राहुल सांकृत्यायन यांच्या  जन्मदिनी ९ एप्रिल व स्मृती दिवस १४ एप्रिल च्या निमित्ताने त्यांची काही उद्धरणे

  1. आपण आपल्या मानसिक दास्याच्या बेडीची एक एक कडी कठोरपणे तोडून फेकून द्यायला सदैव तयार रहायला हवं. बाहेरील क्रांतीपेक्षा मानसिक क्रांती जास्त गरजेची आहे. आपल्याला मागे पुढे उजवीडावीकडे दोन्ही हातांनी नंगी तलवार नाचवत आपल्या सगळ्या रुढींना कापत पुढे जावं लागेल.
  2. खरं सांगायचं तर, ‘‘धर्म तर शिकवतोच आपसांत वैर ठेवायला. भावालाच भावाचे रक्त प्यायला’’.हिेंदूस्तानातील लोकांची एकजूट, धार्मीक मिलापातून नाही होणार, तर ती धर्माच्या चीतेवरच होइल. कावळ्याला घासून राजहंस नाही बनवता येणार. धर्माचा रोग स्वाभाविक आहे. त्याच्या मृत्यू खेरीज दुसरा उपाय नाही.
  3. जर जनशक्ती वर विश्वास असेल तर आपन निराश होण्याची गरज नाही. जनतेच्या दुर्दम्य शक्तीने फासीवादाच्या काळ्या ढगांमध्ये आशेच्या विजेचा संचार केलाय. तीच अमोघ शक्ती आपल्या भविष्याची सुद्धा गॅरंटी आहे.
  4. रुढींना लोक चिकटून यासाठी बसतात कारण त्यांच्यासमोर रुढींना तोडल्याची पर्याप्त उदाहरणे नसतात.
  5. आपल्या समोर जो मार्ग आहे त्याचा बराच भाग घडून गेलाय, काही आपल्या समोर आहे आणि बराच भाग पुढे येणार आहे. घडून गेलेल्यातून आपण सहाय्य घेतो, आत्मविश्वास कमावतो, घडलेल्या गोष्टीकडे परत मागे जाण्याने प्रगती नाही तर प्रतीगती-अधोगती होइल. आपण पून्हा मागे तर जाउ शकत नाही कारण भुतकाळाला वर्तमान बनवणे निसर्गाने आपल्या हाती नाही दिलं.
  6. जातीभेद ना केवळ लोकांना तुकड्या तुकड्यात विभाजित ठेवतो, तर सगळ्यांच्या मनांत उच्चनिच्च पणाचा भावही निर्माण करतो. आपल्या पराभवाचा सारा इतिहास सांगतो की या जाती भेदामुळेच आज आपली ही अवस्था आहे .ही घाण त्याच लोकांनी पसरवली आहे जे धनी होते किंवा ज्यांना धनवान व्हायचं होतं. सगळ्यांच्या मागे विचार आहे धन गोळा करून ठेवण्याचा किंवा त्याच्या रक्षणाचा. गरीब वा स्वताच्या कष्टाची भाकर खाणाऱ्यालाच सर्वात अधिक नुकसान सोसावं लागतं. पण हजारो वर्षांपासून जातीपाती विषयी जनतेमध्ये जो एक विचार पैदा केलाय, तो त्यांना वास्तविक परीस्थितीकडे नजरही टाकू देत नाही. स्वार्थी नेते यामध्ये सगळ्यांत मोठी अडचण आहेत.
  7. धर्माच्या बुडाला वाळवी लागली आहे. त्यामुळे धर्मांच्या मेलमिलापाच्या गोष्टी कधी कधीच कानावर पडतात. पण मग हे शक्य आहे का, ‘धर्म नाही सांगत आपसांत वैर करण’, या शुद्ध खोटारडेपणाचे काय करायचं. जर धर्म वैर सांगत नाही तर मग  शेंडी व दाढी च्या संघर्षात  हजारो वर्षापासून आपला देश का वेडा झालाय. जुन्या इतिहासाच्या गोष्टींना सोडा, आज सुद्धा या देशातली शहरे व गावांतून एका धर्माच्या  लोकांच्या रक्ताची तहान दुसऱ्या धर्म वाल्यांना कोण लावतय, कोण गाय न खाणाऱ्याना गाय खाणाऱ्यांशी लढवत आहे. खरी गोष्ट तर ही आहे की धर्म तर सांगतोच आपापसांत  वैर  धरायला. धर्म आजही तसाच हजारो मुर्ख विश्वासांचा पोषक आणि मनुष्याच्या मानसिक दास्याचा समर्थक आहे .जसा तो पाच हजार वर्षांपुर्वी होता. सगळे धर्म दयेचा दावा करतात, पण भारतातल्या या धार्मीक झगड्यांना पाहीले तर खुद्द माणूसकीच आसरा शोधू पहाते आहेत.

 

कामगार बिगुल, एप्रिल २०१७