उद्धरण

माझी जीवनावर फार निष्ठा असून, मला माणसं फार आवडतात. त्यांची श्रमशक्ती महान आहे. ती जगतात, व जगाला जगवतात. त्यांच्या बळावरच हे जग चालतं. त्याला विद्रूप करणं मला आवडत नाही.

अण्णा भाऊ साठे

भारताची स्थिती आज अत्यंत दयनीय बनली आहे. एका धर्माचे अनुयायी दुसऱ्या धर्माच्या अनुयायांचे कट्टर शत्रू बनले आहेत. आता तर एका धर्माचे असणे म्हणजे दुसऱ्या धर्माचे हाडवैरी असणे असेच होऊन बसले आहे…
अशा परिस्थितीत हिंदुस्तानचे भविष्य अत्यंत अंधःकारमय दिसू लागले आहे. या ‘धर्मांनी’ हिंदुस्तानला संकटाच्या गर्तेत लोटले आहे. या धर्मांध दंगली भारताची पाठ कधी सोडतील, हे आज सांगता येणे कठीण आहे. जगाच्या नजरेत या दंगलींनी भारताला बदनाम केले आहे. या अंधविश्वासाच्या प्रवाहात सर्वजण वाहत चालल्याचे चित्रच आपल्याला दिसत आहे. थंड डोक्याने विचार करणारा हिंदू-मुसलमान अथवा शीख आज अपवादानेच दिसतो आहे. बाकी सगळे धर्माच्या नावाने हातात लाठ्या-काठ्या, तलवारी व सुरे घेऊन परस्परांची डोकी फोडून मरून जात आहेत. यातून वाचणारे काही फासावर जातात, तर बाकीच्यांना तुरुंगात डांबले जाते. एवढा रक्तपात झाल्यानंतर या ‘धार्मिक’ लोकांवर इंग्रज सरकारचा बडगा बसतो आणि मग त्यांच्या डोक्यातील किडा वळवळायचा थांबतो.

भगत सिंह

क्रांतिकारी सर्वहाराचा मानवतावाद साधासरळ आहे. तो मानवतेबद्दलच्या प्रेमाचे सुंदर शब्दांमध्ये शाब्दिक जाळे विणत नाही. त्याचे लक्ष्य आहे जगभरातील सर्वहाराला भांडवलशाहीच्या लज्जास्पद, रक्तबंबाळ, वेडसर जोखडातून मुक्त करणे आणि मनुष्याला हे शिकवणे की त्यांनी स्वतःला विकत घेतला जाणारा आणि विकला जणारा माल किंवा विषयासक्त लोकांच्या ऐयाशीसाठीचा कच्चा माल समजू नये. एखाद्या जख्ख म्हाताऱ्याने एखाद्या तरुण, आरोग्यवान स्त्रीवर अत्याचार करावा आणि गर्भाधान नव्हे तर म्हातारपणातील आजार तिला द्यावा, अगदी तसाच अत्याचार भांडवलशाही जगावर करीत असते. सर्वहारा मानवतावाद प्रेमाच्या विलक्षण घोषणांची मागणी करीत नाही, तो प्रत्येक कामगाराकडून आपल्या ऐतिहासिक कर्तव्याप्रति चेतनेची व सत्तेवर त्याच्या अधिकाराची अपेक्षा करतो… विषयलोलुप, परजीवी, फासिस्ट, खूनी, सर्वहारा वर्गाचे गद्दार यांच्याबद्दल तीव्र घृणेची अपेक्षा तो करतो. तो अशा लोकांबद्दल तिरस्काराची अपेक्षा करतो जे दुःखाला कारणीभूत आहेत आणि हजारो-लाखो लोकांच्या दुःखावर जे जगत आहेत.

मॅक्सिम गोर्की

“उदारमतवादी लोक संघर्षाचे नेतृत्व करूच शकत नाहीत कारण ते संघर्षाला घाबरतात. प्रतिक्रिया तीव्र झाली की ते संविधानाचे रडणे गाऊ लागतात आणि अशाप्रकारे आपल्या संधिसाधूपणाने ते लोकांची डोकी बिघडवण्याची कामं करतात.
… एखाद्या उदारमतवाद्याला शिवी दिली जावी तर तो म्हणतो कि नशीब त्याला मारहाण नाही झाली, मारहाण झाली तर तो देवाचे आभार मानतो कि त्याचा जीव नाही घेतला आणि जीव गेला तर तो ईश्वराला धन्यवाद देतो कि त्याचा अनश्वर आत्मा त्याच्या नश्वर देहापासून मुक्त झाला.”

उदारमतवादी लोकांबद्दल लेनिन

कामगार बिगुल, नोव्हेंबर 2020