Tag Archives: अमेरिका

अमेरिकी राष्‍ट्रपती डोनाल्‍ड ट्रम्‍पची धोरणे आणि जनतेचा प्रतिकार

ट्रम्‍पसारखा अत्‍यंत खालच्‍या दर्जाच्‍या लंपट आणि स्‍त्रीविरोधी व्‍यक्ति जगातील सर्वात मोठ्या भांडवली शिखरावर बसणे, म्‍हणजे भांडवलशाहीच्‍या पतनाची अंतिम टोक गाठणारी अभिव्‍यक्ति आहे. पतनाला लागलेली भांडवली व्‍यवस्‍था जनवाद आणि मानवतेचा पातळ पडदा स्‍वच्‍छ प्रतिमेच्‍या बुर्जुआ नेत्‍यांच्‍या माध्‍यमातून स्‍वत:वर पांघरण्‍याचा जो प्रयत्‍न करत असते, तोच पडदा ट्रम्‍प सारखा लंपट नेता गुंडाळून ठेवण्‍याचे काम करतो. संपुर्ण जग अजुनही आश्‍चर्यचकीत झाले आहे कि ट्रम्‍प सारख्‍या नेता सत्‍तेत कसा येऊ शकतो, ज्‍याने निवडणूकीच्‍या प्रचारात अत्‍यंत खालच्‍या पातळीवर जाऊन स्‍त्री विरोधी भाष्‍य, स्‍थलांतरांविरोधी तसेच इस्‍लाम विरोधी घोषणा दिल्‍या होत्‍या. परंतु रचनात्‍मक संकटाच्‍या काळात भांडवलशाहीची राजकीय अभिव्‍यक्ती फासीवादी वृत्‍तीनां अनेक रूपात आणते,यात अजीबात आश्‍चर्यचकित करणारी गोष्‍ट नाही. अमेरिकी निवडणूकीतील ट्रम्‍पीय परिणामावरून हे आपण समजुन घेऊ शकतो.

जगातील सर्वात मोठा युद्ध गुन्हेगार – संयुक्त राज्य अमेरिका

‘दहशतवादाविरुद्ध लढाई’च्या नावाखाली अमेरिकेने जगभरात जेवढी युद्धे छेडली आहेत, व त्यातून अमेरिकेला जो नफा होतो त्याचे मोजमाप करणेसुद्धा अवघड आहे. जगात युद्धे सुरु ठेवणे हे अमेरिकेला त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या मंदीच्या काळात अत्यंत गरजेचे आहे. महाशक्ति बनल्यानंतर जी असंख्य युद्धे अमेरिकेने जगातील जनतेवर लादली त्यातून अमेरिकेचा प्रचंड फायदा झाला, पण हेसुद्धा सत्य आहे की जनतेच्या अदम्य प्रतिकारासमोर अमेरिकेला नेहमीच पराभव पत्करावा लागला. १९५५ मध्ये अमेरिकेने जेव्हा व्हिएतनामवर साम्राज्यवादी युद्ध लादले त्यावेळी अमेरिकाला तिच्या सैन्य शक्तीचा प्रचंड अभिमान होता. परंतु लवकरच तिला ह्या गोष्टीची जाणीव झाली की आपल्या सैन्य शक्तीपेक्षाही झुंझार कष्टकरी जनतेची ताकत जास्त आहे. २० वर्षे चाललेल्या ह्या युद्धात अमेरिकेने अमानवीय युद्ध अपराध केले. व्हिएतनामवर कार्पेट बॉम्बिंग केली गेली आणि संपूर्ण युद्धात तब्बल ४० लाख व्हिएतनामी नागरिकांना जीव गमवावा लागला. परंतु जनतेच्या अभूतपूर्व संघर्षापुढे अमेरिका टिकू शकली नाही आणि शेवटी ह्या युद्धात तिचा अत्यंत लाजीरवाणा पराभव झाला. तत्पूर्वी, १९५३ मध्ये उत्तर कोरियाने सुद्धा जनतेच्या अदम्य साहसाचे दर्शन घडवीत अमेरिकेला पाणी पाजले होते.