Tag Archives: अरविंद

जाती आधारित जनगणना आणि आरक्षणावर अस्मितेच्या राजकारणाचा मथितार्थ

जात-आधारित जनगणना झाल्यामुळे किंवा न झाल्यामुळे व्यापक कष्टकरी लोकांच्या जीवनात कोणताही अर्थपूर्ण बदल होणार नाही. आज जेव्हा उदारीकरण-खाजगीकरणाच्या धोरणांमुळे रोजगाराच्या आणि शिक्षणाच्या कमी होत चाललेल्या संधींवर प्रश्न उपस्थित व्हायला हवा, तेव्हा उरल्या-सुरल्या मोजक्या नोकऱ्यांसाठी लोकांना जातीय अस्मितेच्या राजकारणात ढकलणे हे षड्यंत्रापेक्षा कमी नाही.

पैशाच्या परगण्यात अध्यात्माचा धिंगाणा!

आपल्या प्रिय भारत देशाला कृषिप्रधान म्हणण्याबरोबरच बाबाप्रधान देश म्हटले तर काही अतिशयोक्ती होणार नाही. असे म्हणण्याचे कारण अगदी उघड आहे. इथे आपल्याला डाल डाल पर चिडिया का बसेरा तर कुठे दिसणार नाही पण इथे तिथे सगळीगडे बुवा (आणि बायासुद्धा) निश्चितच दृष्टीस पडतील. यांच्या कपड्यांवरून आपण या सगळ्यांना एका तागडीत तोलण्याचा प्रयत्न कराल तर हमखास घोटाळा होईल. यांचे वेगवेगळे प्रकार आहे आणि हे वेगवेगळे प्रकार एकदुसऱ्यापासून पूर्णपणे भिन्नसुद्धा आहेत. सर्वांचे आपापल्या भक्तांचे वेगळे स्वतंत्र साम्राज्य आहे आणि हे साम्राज्या टिकवून ठेवण्याचे वेगवेगळे डावपेचही आहेत.