Tag Archives: पॅ

गाझापट्टीतील एका चिमुकल्याची कविता / कविता कृष्णपल्लवी

बाबा!
मी पळू शकत नाहीये
रक्ताळलेल्या मातीने बरबटलेले माझे बूट
फारच जड झालेयत
माझे डोळे आंधळे होताहेत
आकाशातून बरसणार्‍या आगीच्या चमचमाटाने
बाबा,
माझे हे हात आता दगड दूरपर्यंत फेकू शकत नाहीत
आणि माझे पंखसुद्धा अद्याप खूप लहान आहेत