बुलडोझर ‘न्याय’ नव्हे, बुलडोझर दडपशाही! निशाण्यावर कामगार-कष्टकरी आहेत, फक्त मुस्लिम नाहीत!
फाशिस्ट मोदी सरकारकडून गेल्या काही वर्षांपासून या देशात एक विचार सातत्याने जनमानसात रुजवण्यात येत आहे. तो म्हणजे या देशातील अल्पसंख्य असलेल्या मुस्लिम समुदायाच्या इमारतींवर म्हणजेच त्यांच्या घरांवर, दुकानांवर व धार्मिक जागांवर, कायद्याची प्रक्रिया धाब्यावर बसवत सूड भावनेने बुलडोझर चालवून जागा उध्वस्त करणे आणि याला दंडात्मक कारवाई म्हणून जनमानसात प्रस्थापित करणे.