पेगासस: दमनाचे, जनतेवर पाळत ठेवण्याचे नवे हत्यार
सरकारद्वारे नागरिकांवर पाळत ठेवले जाणे नवीन तर नाहीच; उलट एक नियमित बाब आहे. जगभरातील भांडवली सरकारांना जनतेची नेहमीच भिती वाटत आली आहे. त्यामुळेच सामाजिक-राजकीय कार्यकर्त्यांवर सर्व हालचालींवर नजर तर ठेवलीच जात आली आहे, याउप्पर शक्य असेल तेथे सर्व नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर पाळत ठेवण्याचे कामही केले जाते. यामध्ये कायदेशीर आणि बेकायदेशीर अशा दोन्ही मार्गांचा वापर विविध सरकारं करत आली आहेत.