भारतीय जनतेचे जीवन, संघर्ष आणि स्वप्नांचे सच्चे चित्रण करणारे महान कथाशिल्पी प्रेमचंद यांच्या जन्मदिवसा (३१ जुलै) निमित्त
“स्वराज्य येऊन सुद्धा संपत्तीचे प्रभुत्व असेच कायम राहणार असेल आणि सुशिक्षित समाज असाच स्वार्थांध बनून राहणार असेल, तर माझ्या मते असे स्वराज्य न येणंच चांगलं. आङ्ग्लाळलेल्या अभिजनांची धनलोलुपता आणि सुशिक्षितांचा आपमतलबीपणाच आपली दुरवस्था करत आहे. जे दुर्गुण दूर करण्यासाठी आज आम्ही प्राण तळहातावर घेऊन काम करत आहोत, तेच दुर्गुण जनता केवळ त्यामुळे स्वीकार करेल की ते विदेशी नसून स्वदेशी आहेत? कमीत कमी माझ्या साठी तरी स्वराज्याचा अर्थ केवळ हा नाही की जॉनच्या जागी गोविंद विराजमान व्हावा”.
– प्रेमचंद (‘आहुति’ कथेची नायिका)
“…अशा प्रकारची जबरदस्ती करण्यासाठी हवा तो कायदा बनवा. इथे सरकारला जाब विचारू शकेल असे कोणीही नाही. सरकारचे सल्लागार तर सेठ-महाजनच आहेत.
…हे सर्व नियम भांडवलदारांच्या फायद्यासाठी बनवण्यात आले आहेत आणि भांडवलदारांनाच ते नियम कुठे उपयोगात आणले जावेत हे ठरवण्याचे अधिकार सुद्धा देण्यात आले आहेत. कुत्र्याला भाकरीचा पहारेकरी बनवण्यात आले आहे.
– प्रेमचंद (‘रंगभूमि’ कादंबरी मधील पात्र सूरदास)
कामगार बिगुल, ऑगस्ट २०१५