उद्धरण

“नागरिक अवज्ञा आपली समस्या नाहीये. आपली समस्या आहे नागरिकांची आज्ञाधारकता. आपली समस्या आहे की जगभरात लोक नेत्यांच्या, हुकूमशहांच्या आदेशांचे पालन करत आलेत .. आणि या आज्ञाधारकतेमुळे कोट्यवधी लोक मारले गेले आहेत. … आपली समस्या ही आहे की जगभरात गरिबी, भूकबळी, अज्ञान, युद्ध आणि क्रूरतेचा सामना करणारे लोक आज्ञाधारक बनून आहेत. आपली समस्या ही आहे की लोक आज्ञाधारक बनलेले आहेत जेव्हा तुरुंग सामान्य चोरांनी भरलले आहेत आणि मोठे चोर देश चालवत आहेत. ही आमची समस्या आहे”

हॉवर्ड झिन, प्रसिद्ध अमेरिकन इतिहासकार आणि कार्यकर्ते (1922-2010)

“माझ्यासाठी ही कल्पना करणे सुद्धा अवघड आहे की एक बेरोजगार, भुकेला माणूस कुठल्या प्रकारे ‘व्यक्तिगत स्वातंत्र्याचा’ आनंद उपभोगू शकतो. वास्तविक पाहता स्वातंत्र्य केवळ तेच असू शकते जिथे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीचे शोषण आणि उत्पीडन नसेल; जिथे बेरोजगारी नसेल, आणि व्यक्तीला स्वतःचा रोजगार, स्वतःचे घर आणि दररोजची भाकरी हिसकावून घेतली जाण्याची भीती नसेल. केवळ अशाच समाजात, कागदावर नव्हे, तर प्रत्यक्षात व्यक्तिगत आणि अन्य कुठल्याही प्रकारचे स्वातंत्र्य अस्तित्वात येऊ शकते.”

विश्व सर्वहाराचे महान नेता जोसेफ स्तालिन (१८ डिसेंबर १८७८ – ५ मार्च १९५३)

“एक सच्चा व्यक्ती रस्ता तिथे शोधत नाही जिथे सुख आणि सुविधा असतात तर तिथे शोधतो जिथे त्याचे कर्तव्य त्याला बोलावत असते. असा मनुष्य खऱ्या अर्थाने एक असली मनुष्य असतो कारण त्याचे आजचे स्वप्न उद्या वास्तव बनेल; कारण अशा व्यक्तीने इतिहासातील उलथापुलथींचा अभ्यास केलेला असतो आणि त्याला माहित असते की कशाप्रकारे जुन्या सभ्यता आणि राजमुकूट संघर्षांच्या ज्वाळेत जळून राख झालेत, वर्षानुवर्षे चालत आलेल्या रक्त आणि खूनांनी भरलेल्या संघर्षांचा विनाअपवाद एकच अर्थ आहे की भविष्य त्यांचे आहे जे आपल्या कर्तव्यात अग्रसर आहेत.”

कुबा चे महान क्रान्तिकारी जोस मार्ती

जगभरातील कामगारांचे शिक्षक व चीनी क्रांतीचे महान नेते माओ त्से तुङ यांच्या जन्मदिनी (26 डिसेंबर) निमित्त

“प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस जरूर मरतो, पण प्रत्येक माणसाच्या मृत्युचे महत्व वेगवेगळे असते. ––– जनतेसाठी प्राण अर्पण करण्याला उत्तुंग पर्वतापेक्षाही जास्त महत्व आहे, पण फॅसिस्टांसाठी तसेच शोषक आणि उत्पीडकांसाठी प्राण देण्याला पंखापेक्षाही हलके महत्व आहे.”

“दुसऱ्यांसाठी प्रकाशाचा एक किरण बंदी बनणे, दुसऱ्यांच्या जीवनाला दैदिप्यमान करणे, हे सगळ्यात मोठे सुख आहे जे मानव प्राप्त करू शकतो. यानंतर कष्ट अथवा त्रास, दुर्भाग्य किंवा अभावांना मनुष्य घाबरत नाही. मग मृत्यूचे भय त्याच्या आतून नष्ट होते, आणि खरोखर जीवनाला प्रेम करणे तो तेव्हाच शिकतो. आणि, फक्त तेव्हाच पृथ्वीवर आपले डोळे उघडून तो अशाप्रकारे चालू शकतो ज्यामुळे तो सर्व काही बघू, ऐकू आणि समजू शकेल; फक्त तेव्हाच आपल्या संकुचित कवचातून बाहेर पडून तो बाहेर प्रकाशात येऊ शकतो आणि समस्त मानवजातीच्या सुख आणि दु:खांचा अनुभव घेऊ शकतो. आणि फक्त तेव्हाच तो खरा मनुष्य बनू शकतो.”

एफ. ज़र्जि़न्स्की

“जगण्यापेक्षा लोक आपला सगळा वेळ जगण्याच्या तयारीमध्ये घालवून बसतात. आणि मग एवढा सगळा वेळ हातातून निघून गेल्यावर ते स्वतःला लुटलेले बघतात तर आपल्या नशिबाला दोष देऊ लागतात.”

मॅक्सिम गोर्कीची गोष्ट ‘म्हातारी इजरगिल’ मधील एक पात्र

बुर्झ्वा वृत्तपत्रे भांडवलाच्या विशाल ढिगांच्या बळावर चालतात, कामगारांची वृत्तपत्रे स्वत: कामगारांनी गोळा केलेल्या पैशावर चालतात.

लेनिन

 

कामगार बिगुल, जानेवारी 2019