Tag Archives: अभिजित

देश श्रीमंतांच्या टॅक्सच्या पैशांवर चालतो का? नाही!

देशाच्या एकूण राजस्वाच्या जवळपास 80 टक्के सामान्य जनतेच्या खिशातूनच येतो. अशामध्ये उच्च मध्यम वर्ग आणि उच्च वर्गाचा हा दंभ की देश तेच लोक चालवत आहेत – एकदम निराधार आणि मूर्खतापूर्ण आहे. या देशातील कोट्यवधी सामान्य कष्टकरी जनतेच्या जोरावर हा देश चालतो. त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आणि त्यांच्याच पैशाच्या जोरावरही. वास्तवात हे मालक लोकच आहेत जे देशावर ओझं आहेत, जे स्वत: सुद्धा पैदा करत नाहीत आणि सामान्य जनतेच्या मेहनतीला लुटून अंधाधूंद संपत्तीवर कब्जा करतात.

महाराष्ट्रात शेतकरी आणि आदिवासींचा लाँग मार्च: आंदोलनाचे मुद्दे, परिणाम, आणि शिकवण

गरीब शेतकरी ही गोष्ट सहज समजू शकतात की प्रत्येक पीकासोबत दोन-चार हजार रुपये जास्त मिळाले तरी त्यांच्या स्थितीमध्ये कोणताच गुणात्मक फरक पडणार नाही, उलट महागाई वाढून व्याजासोबत त्यांच्या खिशातूनच हे पैसे परत काढले जातील. बेरोजगारीचा मार सहन करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा निर्वाह थोड्याश्या जमिनीतून होऊ शकणार नाही ही गोष्ट स्पष्ट आहे. त्यामुळे तर्काच्या आधारावर विचार केला गेला पाहिजे आणि आपल्या खऱ्या वर्ग हितांची ओळख जाणली पाहिजे. बेरोजगारी, वाढती महागाई, सर्वांसाठी शिक्षण आणि आरोग्य सुविधा, भांडवली लुटीचा नाश, दमन-शोषणाचा नाश हे ते मुद्दे असतील ज्यांच्या आधारावर व्यापक जनतेला एकजूट केले जाऊ शकते. इतकेच नाही या मागण्यांच्या आधारावरच इतर जातीतील गरिबांसोबत, वंशपरंपरागत पद्धतीने शेती सोबत जोडलेल्या जातींमधील बहुसंख्याकांची एकजुटता सुद्धा बनेल. अस्मितेचे राजकारण करणाऱ्या, अस्मितावादी एनजीओ छाप धंदेबाज आणि धनिक शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन पूर्ण जोर लावणाऱ्या शेतकरी युनियन्सकडून गरीब शेतकऱ्यांचं कोणतंच भलं होणार नाही. या गोष्टीला जितक्या लवकर समजले जाईल तितके न फक्त समाजासाठी चांगले असेल, तर खुद्द गरीब शेतकऱ्यांसाठी सुध्दा चांगले असेल.

जीडीपी वाढीच्या दरात घट आणि अर्थव्यवस्थेची बिघडत चाललेली अवस्था: सर्वात जास्त मार तर कष्टकऱ्यांवरच पडत आहे!

अर्थव्यवस्थेत चालू असलेले संकट एका क्षेत्रातील नसून सर्वव्यापक संकट आहे. त्यामुळे आश्चर्य याचे नाही वाटले पाहिजे की जीडीपी वाढीच्या दरात घट झाली आहे, उलट याचे आश्चर्य वाटले पाहिजे की घट इतकी कमी कशी. एवढा वृद्धीदर हे सुद्धा एक आश्चर्यच आहे आणि आपण वर अगोदरच याच्या मोजण्याच्या पद्धतीवर काही प्रश्न उपस्थित केले होते जे याला जबाबदार असू शकतात.

पॅलेस्तिनी लोकांचा स्वातंत्र्यलढा चिरायू होवो! पॅलेस्तिनी जनतेच्या संघर्षाला साथ द्या!

काय आहे इस्त्रायल-पॅलेस्ताईनचा प्रश्न आणि जगाच्या राजकारणात तो इतका महत्वाचा का आहे? जगभरातील भांडवलदारांच्या ताब्यातील मुख्य प्रसारमाध्यमे सतत इस्त्रायलच्या बाजूने लिहिण्याचा किंवा पॅलेस्तिनी बाजू लपवण्याचा प्रयत्न करत असतात. खरेतर जगातील सर्वाधिक हिंमती आणि चिवट असा स्वातंत्र्यलढा पॅलेस्ताईनमधील लोक गेली सात दशके लढत आहेत.

गौरी लंकेश यांच्या हत्येमागील राजकीय संदर्भ

हिंदुत्ववादी विचाराच्या परिवारामध्ये अतिशय उदारमतवादी चेहऱ्याच्या संघटनांपासून ते गुप्त पद्धतीने हत्यारांचे प्रशिक्षण देणाऱ्या संघटना सामील आहेत. दहशतवादी कारवाया करणाऱ्या किंवा त्यांचे समर्थन करणाऱ्या अभिनव भारत ते हिंदु जनजागृती समिती सारख्या संस्था अनेकदा चर्चेत राहिल्या आहेत.  परंतु या खुनांच्या अशाप्रकारच्या गुन्हेगारी विश्लेषणापेक्षा महत्वाचे आहे त्यांचे राजकीय विश्लेषण. कारण सामाजिक-राजकीयदृष्ट्या सक्रीय असलेल्या, हिंदुत्ववादी, फासीवादी, उजव्या विचारसरणीला विरोध करणाऱ्या विचारवंतांच्या या हत्या आहेत. खुन कोणीही केलेला असो, करणाऱ्यांची आणि करवणाऱ्यांची वैचारिक बैठक जास्त महत्वाची आहे. सॉक्रेटीस ते तुकाराम आणि दाभोळकर ते आता गौरी लंकेश असा पुरोगामी विचारकांच्या हत्यांचा मोठा इतिहास आहे. परंतु आजच्या काळात होत असलेल्या या हत्यांना आजच्या राजकीय चौकटीतच बघितले पाहिजे.

मुस्लिम लोकसंख्या वाढीचे मिथक

तुम्हाला अनेकदा हे ऐकायला आणि वाचायला मिळू शकतं की मुस्लिम अनेक लग्न करतात आणि अनेक मुलं जन्माला घालतात. या दाव्याच्या खरेपणाची पडताळणी न करताच लोक याला खरं मानू लागतात. अनेक लोक असे उदाहरण सुद्धा देतात की त्यांच्या अमुक गावामध्ये तमुक मुस्लिम व्यक्तीनं ३ लग्नं केली आहेत. हिंदूंमध्ये प्रचलित असलेल्या या मान्यतेची जरा पडताळणी करूयात.