Tag Archives: अभिजित

रशिया-युक्रेन युद्धात भारताची भुमिका ‘दलाल’ नव्हे ‘स्वतंत्र’ भांडवलदार वर्गाची भुमिका

रशिया-युक्रेन युद्धातील भारताच्या भुमिकेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतातील भांडवलदार वर्गाचे चरित्र एका स्वतंत्र भांडवलदार वर्गाचे आहे आणि तो अमेरिका वा इतर कोण्या साम्राज्यवादी देशांचा ‘दलाल’ भांडवलदार वर्ग नाही.

चुकीच्या कार्यदिशेमुळे पुन्हा एकदा एस.टी. कामगार आंदोलनाच्या पदरी पुन्हा निराशाच!

उच्च न्यायालयाच्या निकालानंतर ‘विलिनीकरणाच्या’ न्याय्य मागणीला घेऊन चालू असलेल्या साडेपाच महिन्यांच्या प्रदीर्घ, चिवट, ऐतिहासिक एस.टी. कामगार आंदोलनाच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे. आम्ही ‘कामगार बिगुल’ मध्ये या अगोदर दिलेला इशारा पुन्हा खरा ठरला आहे. सरकारी समितीचा अहवाल विरोधातच येणार आहे हा पहिला इशारा पूर्वीच खरा ठरला होता, आणि आता न्यायालयाकडून विलिनीकरण मिळणार नाही हा दुसरा इशारा सुद्धा खरा ठरला आहे आणि कामगारांच्या पदरी पुन्हा अपेक्षाभंग आला आहे.

चिले: “समाजवादा”च्या नावाने पुन्हा एकदा फसवे स्वप्न!

गॅब्रियेल बोरिक नावाचा 35 वर्षीय तरुण सर्वाधिक तरुण राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यानंतर, त्याच्या “डावे”पणाचे गोडवे गात जगभरातील सामाजिक-जनवादी (समाजवादी) हर्षोल्लसित झाले आहेत आणि तेथील जनतेच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन होणार अशा वल्गना केल्या जात आहेत.  शोषणमुक्त समाजाची कल्पना मांडणाऱ्या क्रांतिकारी शक्तींनी या प्रचाराला बळी पडता कामा नये.

कामगार वर्गाचा राजकीय पक्ष कसा असावा?

कामगार वर्गाचा आपला स्वत:चा पक्ष असतो, परंतु तो भांडवलदार वर्गाच्या पक्षाप्रमाणे नसतो. तो कामगार वर्गाची विचारधारा म्हणजे मार्क्सवादी विज्ञान आणि तत्वज्ञानावर आधारित असतो. मार्क्सवादाच त्याकरिता होकायंत्राचे काम करतो आणि त्याला दिशा दाखवतो. मार्क्सवादच्या वैज्ञानिक विचारधारेच्या आणि तत्वांच्या उजेडात आणि क्रांतिकारी जनदिशेला लागू करूनच कामगार वर्गाचा क्रांतिकारी पक्ष आपली राजकीय दिशा आणि कार्यक्रम ठरवतो.

तेलंगणा शेतकरी सशस्त्र संघर्षाची 75 वर्षे मिळकत आणि शिकवण (दुसरा आणि अंतिम भाग)

निजामाच्या आत्मसमर्पणानंतर जवळपास 50 हजार भारतीय सैनिकांनी शेतकरी विद्रोहाला चिरडण्यासाठी तेलंगणाच्या गावांकडे कूच केले. सैन्याने तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात अटका, छळ, जाळपोळ, आणि निघृण हत्या घडवत निझामाच्या सेनेला आणि रझाकारांनी केलेल्या जुलमालाही मागे टाकले

एस.टी. कर्मचाऱ्यांचे विलिनीकरणासाठी भव्य आंदोलन: शिकवण आणि पुढील दिशा

एस.टी. कामगार आंदोलन एका शक्यतासंपन्न टप्प्यावर उभे आहे. आंदोलनाचे यश योग्य वैचारिक समजदारीची आणि कार्यदिशेची मागणी करते.
राज्यभरात पसरलेले जवळपास 1लाख कामगार ही मोठी शक्ती बनू शकते. आंदोलन विस्कळीत करण्याचे सरकारचे प्रयत्न आणि जनतेला विरोधात नेण्याचा भांडवली प्रसारमाध्यमांचा डाव हाणून पाडण्यासाठी व्यापक जनतेपर्यंत आपला मुद्दा घेऊन जाऊन आंदोलनाला जनसमर्थन मिळवणे, व्यापक कामगार वर्गीय मागण्यांशी जोडून घेत आंदोलनाला व्यापक करणे, लोकशाही मार्गाने आपले संघटन पुन्हा उभे करत सरकारशी संघर्ष चालू ठेवणे आणि स्पष्ट कामगारवर्गीय राजकीय समजदारीवर आधारित एकता मजबूत करणे ही आज आंदोलनाची गरज आहे.

क्रांतिकारी शहीद साथी प्रीतिलता वड्डेदारच्या शहादत दिनाच्या (23 सप्टेंबर) निमित्ताने…

देशासाठी प्राण देण्याची उर्मी ती शक्ती आहे जी विविध पार्श्वभूमीतून आलेल्या क्रांतिकारकांना एकमेकांवर तसेच जनतेवर अगाध विश्वास आणि प्रेम देते. आजच्या तरुण पिढीला सुद्धा आपल्या पूर्वजांबद्दल आणि त्यांच्या क्रांतिकारी प्रेरणेबद्दल काहीतरी माहिती नक्कीच असली पाहिजे.

एव्हरग्रांड संकट: चीनमध्ये गृहनिर्माण उद्योग गंभीर संकटात

एकीकडे अतिप्रचंड भांडवलरूपी पैसा आहे, त्यातून घर बांधून लोकांच्या गरजा भागवण्याचीही क्षमता आहे, इतकेच नाही तर कोट्यवधी घरे पडून आहेत; परंतु दुसरीकडे कोट्यवधी बेघर आहे आणि झोपडपट्ट्य़ांमध्ये राहतात कारण की भांडवली व्यवस्थेचे नफ्याचे उद्दिष्ट लोकांच्या गरजांकरिता घरे बांधत नाही तर नफ्याच्या माध्यमातून भांडवलाच्या वाढीसाठी बांधते; आणि नफ्याचा दर घसरू लागला की भांडवली व्यवस्थेच्या नियमाने एकीकडे घरे रिकामी राहतात आणि दुसरीकडे लोक बेघर! 

अफगाणिस्तानातून अमेरिकेची माघार, तालिबानची वाढती पकड

एका शेजारच्या देशामध्ये धार्मिक कट्टरपंथी, दहशतवादी तालिबानचे सत्तेवर येणे भारतीय राजकारणावर परिणाम करणारे ठरेलच, सोबतच जागतिक राजकारणातही उलथापालथ केल्याशिवाय राहणार नाही. भारतातील कामगार वर्गाकरिता सुद्धा ही घटना धोक्याची घंटा आहे कारण देशांतर्गत राजकारणात या घटनेमुळे धर्मवादी, फॅसिस्ट शक्तींना अजून एक मुद्दा मिळणार आहे.

तुमच्या जळवांचा ऱ्हास

तुमच्या जळवांचा ऱ्हास राहुल सांकृत्यायन( अनुवाद: अभिजित) लेखकाचा   परिचय राहुल सांकृत्यायन (1893-1963) खऱ्या अर्थाने जनतेचे लेखक होते. ते आजच्यासारख्या तथाकथित प्रगतिशील लेखकांसारखे नव्हते, जे जनतेच्या जीवन आणि संघर्षापासून अलिप्त राहून…