क्रांतिकारी कामगार शिक्षण मालिका – 7
ॲडम स्मिथचे योग्य उत्तराधिकारी डेव्हिड रिकार्डो यांनी या शोधाची गणना राजकीय अर्थशास्त्राच्या सर्वात महत्त्वाच्या सिद्धांतांमध्ये केली. परंतु ॲडम स्मिथ आपला सिद्धांत केवळ साधारण माल उत्पादनालाच सुसंगतपणे लागू करू शकले, म्हणजे माल उत्पादनाचा तो काळ जेव्हा उत्पादनाच्या साधनांचा मालक स्वतः प्रत्यक्ष उत्पादकच आहे; म्हणजेच जोपर्यंत भांडवली माल उत्पादनाचे युग सुरू झालेले नव्हते.