जोतीराव फुले – स्त्रीमुक्ती चे पक्षधर आणि जाती अंताच्या संघर्षाचे योद्धे
सामाजिक परिवर्तनासाठी जोतीराव फुले कधीही सरकार कडे जोडे झिजवत बसले नाहीत. उपलब्ध साधनांसहीत त्यांनी आपल्या संघर्षास सुरुवात केली. सामाजिक प्रश्नांबाबतही फुले, शेटजी आणि भटजी या दोघांना शत्रू म्हणून चिन्हीत करतात. आयुष्याच्या उत्तरार्धात ते ब्रिटीश शासनाच्या आणि भारतातील ब्राम्हणवाद्यांच्या यूतीला ओळखायला लागले होते म्हणूनच ते म्हणाले होते की इंग्रजांच्या सत्तेमध्ये बहुतेक अधिकारी ब्राम्हण आहेत आणि जरी काही अधिकारी इंग्रज असले तरी ते हाडाने ब्राम्हणच आहेत.