Tag Archives: प्रियंवदा

महिला आरक्षणावर कामगारवर्गीय दृष्टिकोन काय असावा?

मोदी सरकारच्या इतर सर्व जुमल्यांप्रमाणे महिला आरक्षणाच्या जुमल्याचे सत्य सुद्धा, आरक्षणाचे विधेयक येताच अनावृत झाले. या विधेयकाचे समर्थन करणाऱ्या बुर्झ्वा राजकीय पक्षांच्या बुर्झ्वा महिला नेत्या आणि खात्या-पित्या मध्यमवर्गातून येणाऱ्या महिलांसाठी सुद्धा हे विधेयक एक फुसका फटाकाच सिद्ध झाले. मोठ्या गाजावाजात संसदेच्या विशेष सत्रात हे विधेयक आणले गेले आणि जोरदार धूरळा उडवला गेला. परंतु हा धूरळा बाजूला होताच समोर आले की पुढील जनगणनेपर्यंत आणि मतदारसंघ फेररचना होईपर्यंत हा कायदा लागू होणारच नाही.

दिल्ली अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा झुंझार लढा चालूच

दिल्लीच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन इतिहासाच्या पानांवर कोरले जात आहे. ह्या संघर्षातून जगभरातील कामगार आंदोलने प्रेरणा घेत आहेत