Tag Archives: मुनीश

क्रांतिकारी सोवियत संघातील आरोग्य सेवा

सोवियत संघात आरोग्य सेवा-सुविधा सर्व जनतेसाठी निशुल्क उपलब्ध होत्या; तिथे ना गोरखपुर प्रमाणे ऑक्सिजन सिलेंडर च्या अभावी लहान मुलं मरत होती, ना भूक कुणाचा जीव घेत होती. सोवियत रशियात गृहयुद्धाच्या (1917-1922) काळात आरोग्य सेवा फारच मागे पडली होती. 1921 मध्ये जेव्हा गृहयुद्धात सोवियत सत्ता जिंकली तेव्हा रशियामध्ये सर्व ठिकाणी युद्धामुळे प्रचंड वाईट परिस्थिती होती. देशभरात टायफॉईड आणि देवी सारख्या आजारामुळे अनेक लोक मरत होते. साबण, औषधे, आहार, घर, शाळा, पाणी इत्यादी तमाम मुलभूत सुविधांचा चारही दिशांनी दुष्काळ होता. मृत्युदर कित्येक पट वाढला होता आणि  प्रजनन दर कमी झाला होता. चारही दिशांनी अव्यवस्थेची परिस्थिती होती. संपूर्ण देश आरोग्य कर्मचारी, दवाखाने, खाटा, औषधं, विश्रामगृह ह्या सगळ्यांच्या अभावाच्या समस्येशी झगडत होता.