सी.यु.सी.ई.टी: उच्च शिक्षणाला गरीबांपासून वंचित करण्याचे अजून एक पाऊल!
भारतातील शिक्षण व्यवस्था जशी खासगी होऊ लागली तशी विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा सुरु करणे भांडवलशाहीची गरज बनली. याचे कारण, प्रत्येक उद्योगक्षेत्राच्या आणि बाजाराच्या गरजेनुसार विविध प्रकारचे कामगार तयार करणाऱ्या अभ्यासक्रमांच्या जागा मर्यादित ठेवायच्या होत्या,