मुंबई मधील देवनार महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत वर्गखोल्या आणि शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले!
मुळात मुलांचं शिक्षण करणं हे आजच्या नफाकेंद्री व्यवस्थेच्या प्रचंड महागाईच्या जाळ्यात अडकल्यानंतर गरीब कष्टकरी कुटुंबांसाठी एक आव्हान बनलेलं आहे. ते आव्हान पेलून जी मुलं सरकारी शाळेच्या दारापर्यंत येतात त्यांना देखील जर प्रवेश नाकारला जात असेल तर हे म्हणणं वावगं ठरणार नाही की ‘सर्व शिक्षा अभियान’ म्हणत गावभर बोभाटा करणाऱ्या भांडवली सरकारांच्या ठायी गरीब कष्टकरी कुटुंबांतील मुलांचे शिक्षण कस्पटाप्रमाणे आहे.