Category Archives: वारसा

उदारमतवादा विरोधात लढा

उदारमतवाद हा संधीसाधूपणाची अभिव्यक्ती आहे आणि त्याचा मार्क्सवादासोबत मुलभूत अंतर्विरोध आहे. हा नकारार्थी आहे आणि वस्तुगतरित्या शत्रूला मदत करणारा आहे, यामुळेच शत्रू आपल्यामधील उदारमतवादाचे स्वागत करतो. याचे असे स्वरूप असल्यामुळे, क्रांतिकारी फळ्यांमध्ये याला कुठलीच जागा नसली पाहिजे.

महान अय्यंकाली यांच्या वारशाला विसरू नका! क्रांतिकारी जातिअंताच्या आंदोलनाला पुढे न्या!

अय्यंकाली यांनी सुधारणांसाठी अर्ज विनंत्यांचे काम नाही केले, उलट सडकेवर उतरून ब्राह्मणवाद्यांना खुले आवाहन दिले आणि त्यांना हरवले सुद्धा. अय्यंकालींनी सिद्ध केले की दडपलेली आणि अत्याचार झालेली लोकं ना फक्त लढू शकतात, तर जिंकू सुद्धा शकतात.

तुमच्या देवाचा ऱ्हास

ज्या समस्यांना, ज्या प्रश्नांना, ज्या नैसर्गिक रहस्यांना जाणून घेण्यात माणूस स्वतःला असमर्थ समजत होता, त्याचसाठी तो ईश्वराचा समज करून घेत होता. प्रत्यक्षात देवाचा विचार तर आहे सुद्धा अज्ञानाचीच निर्मिती.

तुमच्या समाजाचा ऱ्हास / राहुल सांकृत्यायन

हा सर्व अन्याय असून सुद्धा कुणाला काही फरक पडत नाही. समाजाचे पंच म्हणतात की, श्रीमंत-गरीब पूर्वीपासून सातत्याने चालत आले आहेत, जर सर्वांना समान केलं तर कोणालाच काम करणं आवडणार नाही; दुनियेला चालवण्यासाठी श्रीमंत-गरीब राहणं आवश्यक आहे. समाजाच्या बेड्या तुरुंगाच्या बेड्यांपेक्षाही मजबूत आहेत. त्यांना सामान्य डोळ्यांनी पाहता येऊ शकत नाही. परंतु जिथे समाज कायद्याच्या विरुद्ध—जरी तो कायदा अगदी अन्यायावर आधारित का असेल ना—काही गोष्ट, घटना घडली की समाज हात धुवून मागे पडतो.

तुमच्या जाती-पातीचा ऱ्हास / राहुल सांकृत्यायन

जातीभेद माणसांना केवळ तुकड्या-तुकड्या विभाजित करत नाही, तर सोबतच तो त्यांच्या मनामध्ये उच्च-नीचतेची जाणीव निर्माण करतो. ब्राह्मण समजतात, आम्ही उच्च आहोत, राजपूत खालचे आहेत; राजपूत समजतात, आम्ही वरचे आहोत, कहार खालचे; कहार समजतात, आम्ही वरचे आहोत, चांभार खालचे; चांभार समजतात, आम्ही वरचे आहोत, मेहतर खालचे आणि भंगी आपल्या मनाला समजाविण्यासाठी कुणाला तरी खालचे म्हणतातच. हिंदुस्तानामध्ये हजारो जाती आहेत आणि त्या सर्वांमध्ये हीच भावना आहे. राजपूत असल्याने हे समजू नका की ते सर्व एकसमान आहेत, त्यांच्यामध्येही हजारो उप-जाती आहेत. त्यांनी उच्च कुळातील मुलीशी लग्न करून आपल्या जातीचे वरचे स्थान सिद्ध करण्यासाठी आपापसात मोठ-मोठ्या लढाया लढल्या आहेत आणि देशाच्या सैनिकी शक्तीचा खुप मोठा अपव्यय केला आहे. आल्हा-उदलच्या लढाया याबाबतीत प्रसिद्ध आहेत.

जर कोणी मालकच नसेल तर कामगाराला काम कोण देईल? – काही  साधी-सोपी समाजवादी तथ्‍य

आपल्या आसपासच्या लोकांकडून विचारला जाणारा हा प्रश्न तुमच्या कानावर नेहमीच पडत असेल किंवा हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. चला तर मग, या प्रश्नाचे उत्तर समजून घेऊयात. अनुवाद करताना पैशाचे चलन आणि समप्रमाणात आकडे बदलण्यात आले आहेत.

जोतीराव फुले – स्‍त्रीमुक्ती चे पक्षधर आणि जाती अंताच्‍या संघर्षाचे योद्धे

सामाजिक परिवर्तनासाठी जोतीराव फुले कधीही सरकार कडे जोडे झिजवत बसले नाहीत. उपलब्‍ध साधनांसहीत त्‍यांनी आपल्‍या संघर्षास सुरुवात केली. सामाजिक प्रश्‍नांबाबतही फुले, शेटजी आणि भटजी या दोघांना शत्रू म्‍हणून चिन्‍हीत करतात. आयुष्‍याच्‍या उत्‍तरार्धात ते ब्रिटीश शासनाच्‍या आणि भारतातील ब्राम्‍हणवाद्यांच्‍या यूतीला ओळखायला लागले होते म्‍हणूनच ते म्‍हणाले होते की इंग्रजांच्‍या सत्‍तेमध्‍ये बहुतेक अधिकारी ब्राम्‍हण आहेत आणि जरी काही अधिकारी इंग्रज असले तरी ते हाडाने ब्राम्हणच आहेत.

सोफी शोल – फासीवादाच्‍या विरोधात लढणारी एका धाडसी मुलीची गाथा

खोल चौकशी व खटल्‍यामध्‍ये न्यायाधीश फ्रेसलर याच्या धमकी नंतरही सोफीने शौर्यान्‍ो आणि दृढतापूर्वक न डगमगता उत्तर दिले, “आम्ही जाणतो तसे तुम्ही देखील जाणता आहात की युद्ध हरले गेले आहे. परंतु तुम्ही तुमच्‍या कायरतेमुळे त्याचा स्विकार करणार नाही. न्यायाधीश रोलैंड फ्रेसलर ने त्या तिघांना देशद्रोही ठरविले व मृत्युदंडाची शिक्षा दिली. त्याच दिवशी त्यांना शिरच्छेद करण्याच्‍या यंत्राने गळा कापून मृत्युदंड दिला गेला. या शिक्षेचा सामना त्या तिघांनी बहादुरीने केला. जेव्हा गळ्यावर यांत्रिक करवत ठेवली तेव्हा सोफी म्हणाली “सुर्य अजुनही तेजोमय आहे” आणि हान्स ने ही “आझादी जिंदाबाद” ची घोषणा दिली.

मार्क्सचे भांडवल समजून घ्याः चित्रांकनासह – भाग पहिला – आदिम संचयाचे रहस्य

अमेरिकेच्या कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आणि प्रसिद्ध राजकीय चित्रकार ह्युगो गेलर्ट यांनी १९३४ मध्ये मार्क्सच्या भांडवलाच्या आधारे एक पुस्तक कार्ल मार्क्सज कॅपिटल इन लिथोग्राफ लिहिले होते. या पुस्तकामध्ये भांडवलमध्ये दिलेल्या प्रमुख अवधारणा चित्रांच्या माध्यमातून समजावल्या गेल्या होत्या. गेलर्ट यांच्याच शब्दांत या पुस्तकामध्ये मूळ पुस्तकातील सर्वांत महत्त्वपूर्ण अंश तेवढे दिलेले आहेत. परंतु मार्क्सवादाच्या मूलभूत जाणीवेसाठी आवश्यक सामग्री चित्रांकनाच्या साहाय्याने दिलेली आहे. कामगार बिगुलच्या वाचकांसाठी या सुंदर कृतीतील अंश या अंकापासून एका शृंखलेच्या रूपात दले जाणार आहेत.

वृत्तपत्र आणि कामगार – अन्तोनियो ग्राम्शी

कामगारांनी भांडवली वर्तमानपत्रासोबत कुठल्याही प्रकारची संलग्नता दृढपणे नाकारली पाहिजे. भांडवली वर्तमानपत्रे (मग त्याचा रंग कोणताही असो) त्यांचे स्वतःचे विचार व हित आणि त्यांच्या विरोधात काम करणारे विचार व हितसंबंध यांच्यामधील संघर्षातील एक उपकरण असते. ह्यात छापल्या जाणाऱ्या गोष्टी एकाच विचाराने प्रभावित झालेल्या असतात, व तो म्हणजे वर्चस्वशाली वर्गाची सेवा करणे, जो वेळप्रसंगी कामगार वर्गाच्या विरोधात रुपांतरित होतो. वास्तविक, भांडवली वर्तमानपत्राच्या प्रत्येक ओळीमध्ये हा पूर्वग्रह दिसून येतो.