Category Archives: Uncategorized

तुमच्या धर्माचा ऱ्हास

धर्म तर आपसात वैर शिकवतो, भावाला भावाचे रक्त प्यायला शिकवतो.  हिंदुस्तान्यांची एकता धर्मांच्या मेळाने नाही तर धर्मांच्या चितेवर होईल. कावळ्याला धुवून हंस बनवता येत नाही. कांबळं धूवून रंगवता येत नाही. धर्मांचा आजार नैसर्गिक आहे. त्याचा, मृत्यूशिवाय इलाज नाही.

रेल्वे खाजगीकरणाच्या रुळावर बुलेट ट्रेनच्या वेगाने पळणारे मोदी सरकार

देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्राला उध्वस्त करून नफेखोरांच्या हवाली करण्याच्या विरोधातला लढा एकट्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा प्रश्न नाही. हा सामान्य जनता आणि सर्व कष्टकऱ्यांचा सुद्धा प्रश्न आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना आपल्या संघर्षाला केवळ सार्वजनिक क्षेत्रातील इतर कष्टकऱ्यांच्या आंदोलनाशीच न जोडता, देशातील सामान्य जनतेला सुद्धा आपल्या आंदोलनांमध्ये जोडून घ्यावे लागेल. सर्व कष्टकरी जनतेला सुद्धा रेल्वे कर्मचार्‍यांच्या संघर्षाला समजून घेत त्यांच्या समर्थनासाठी पुढे यावे लागेल.

तुमच्या देवाचा ऱ्हास

ज्या समस्यांना, ज्या प्रश्नांना, ज्या नैसर्गिक रहस्यांना जाणून घेण्यात माणूस स्वतःला असमर्थ समजत होता, त्याचसाठी तो ईश्वराचा समज करून घेत होता. प्रत्यक्षात देवाचा विचार तर आहे सुद्धा अज्ञानाचीच निर्मिती.

गिरीश कर्नाड: एका निर्भय कलाकारास आदरांजली

ज्येष्ठ रंगकर्मी, नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता, विद्वान, उदारमतवादी, आणि प्रगल्भ सामाजिक जाणीव असलेला, सामाजिक-राजकीय प्रश्नांवर परखड आणि राज्यसत्तेविरुद्ध भुमिका घेण्यास न कचरणारा एक सच्चा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला.

असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या पेंशन योजनेची सत्यपरिस्थिती

सरकार स्वत:चं हे वास्तव स्वीकारत आहे की आपल्या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात 50 टक्के योगदान देणारी जनता अत्यंत कष्टात आणि खूप हलाखीत जगत आहे. अशा कष्टकरी-कामगारांना किमान वेतनही मिळत नाही आणि आरोग्य-विमा व पेंशन यासारख्या सामाजिक सुरक्षा तर फार लांबची गोष्ट आहे.

१ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन पत्रक : मुक्तीचा मार्ग धरावा लागेल, शोषणाविरुद्ध लढावे लागेल

आज दिवस घोषणेचा
आम्हीही आहोत माणुस
हवी आम्हाला चांगली दुनिया
करतो ऐलान
घृणीत गुलामी कोण्या रुपात
नाही आम्हा स्वीकार
मुक्ती आमचे अमीट स्वप्न
मुक्ती आमचे गान