Tag Archives: पवन

कोरोनाच्या काळात अफवा आणि अंधश्रद्धांचा सुळसुळाट!

भारतीय समाजातील अंधश्रद्धा पुन्हा एकदा कोरोनाच्या निमित्ताने बोकाळून आल्या आहेत. सर्वधर्मीय बाबा-बुवांनी लाज आणेल अशाप्रकारे कोरोनाला संपवणाऱ्या औषधी आणि उपाययोजना शोधल्या आहेत आणि व्हॉट्सअप वरचे योद्धे या अंधश्रद्धांना जीवापाड मेहनत करून जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. माझा धर्म मोठा की तुझा या साठमारीमध्ये, आणि धार्मिक-जातीय़ वर्चस्वाच्या विचारांनी ग्रासलेल्या समाजामध्ये कोरोना सारख्या साथीला प्रतिबंध करणे अजून अवघड काम बनवले आहे.

महाराष्ट्रात विविध अपघातांमध्ये कामगारांचे मृत्यू

महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांच्या कामाच्या जागी सुरक्षिततेच्या तरतुदी मांडणारा 1996 सालचा कायदा आणि त्यानुसार बनवलेले 2007 सालचे नियम पूर्णपणे कागदावरच आहेत. यातूनच आपण समजले पाहिजे की सर्व भांडवली पक्ष आणि बिल्डर यांचे किती संगनमत आहे!