वाढत्या महागाई विरोधात फ्रांसची जनता उतरली रस्त्यांवर!
फ्रांसची कामकरी जनता भयानक महागाईचा सामना करत आहे, जी सतत तीव्र होत चाललेल्या भांडवली संकटाचाच परिणाम आहे. ते संकट ज्याला ब्रुसेल्स (युरोपियन युनियनचे मुख्यालय) मधून चालवली जाणारी नोकरशाही धोरणे अजून तीव्र करत आहेत, आणि ज्याला युक्रेनमध्ये रशिया विरोधात चालू असलेले अमेरिकेचे आर्थिक आणि छुपे युद्ध वेगवान करत आहे.