पॅरिस कम्युन: पहिल्या मजूर राज्याची सचित्र कथा (पुष्प पाचवे)
पॅरिस कम्युन मध्ये जनसमुदाय खरोखरचा मालक होता. कम्युन जोपर्यंत अस्तित्वात होते तो पर्यंत जनसमुदाय व्यापक प्रमाणात एकत्र होता आणि सर्व महत्त्वाच्या राजकीय मामल्यांमध्ये लोक आपापल्या संघटनामध्ये विचार-विनिमय करत असत. रोज क्लब मिटींगांमध्ये 20,000 कार्यकर्ते भाग घेत असत, जेथे वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपले प्रस्ताव किंवा टीका मांडत असत. ते क्रांतिकारी वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमध्ये लेख आणि पत्रे लिहून सुद्धा आपल्या आकांक्षा आणि मागण्या मांडत.