हो प्रधानमंत्री महोदय! आम्ही संपदा निर्माण करणाऱ्यांचा सन्मान करतो! पण तुमचे भांडवलदार मित्र संपदा निर्माण करत नाहीत!
समाजामध्ये जे काही उत्पादित होत आहे, जी काही उत्पादनाची साधनं आहेत, ती खरेतर श्रमातून निर्माण झालेली आहेत आणि त्यांना श्रमाचेच उत्पादन म्हटले गेले पाहिजे. पण या उत्पादनाच्या साधनांवर आणि भांडवलावर तर भांडवलदारांची मालकी असते. जे कामगार आहेत, त्यांच्याकडे उत्पादनाची साधनं नसतात, आणि त्यांना जिवंत राहण्यासाठी आपली श्रमशक्ती विकावीच लागते