धीरेंद्र शास्त्री सारख्या पाखंडी बाबा बुवांचे भांडवली, फॅसिस्ट, स्त्री विरोधी, जनता विरोधी चरित्र ओळखा!
भक्तांच्या मनातले सगळे प्रश्न त्यांनी न सांगताच ओळखून त्यावर मंत्र जापाचा किंवा तत्सम अवैज्ञानिक उपाय सांगून आपल्या ‘चमत्काराने’ भक्तांना मोहून टाकणारा बागेश्वर सरकार बाबा नागपुरात रामकथा पारायणासाठी आला असतांना त्याच्यावर अंधश्रध्दा निर्मूलन समिती तर्फे अंधश्रद्धा पसरवण्याचा आरोप आवण्यात आला व त्याला स्वतःच्या दिव्य शक्ती सिद्ध करण्याचे त्याला आव्हान देण्यात आले; परंतु आव्हान फेटाळून कार्यक्रम संपण्याच्या निर्धारित वेळेच्या 2 दिवस आधीच बाबा पळून गेला!