Category Archives: सुधारणावाद / एनजीओ

स्वतःच्या आयुष्यात स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढणे, त्या स्वातंत्र्याची आव्हाने पत्करण्यासाठी भक्कमपणे उभे राहणे आणि स्वतःच्या स्वातंत्र्याच्या संघर्षाला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक स्तरांवर अन्याय अत्याचारांच्या विरोधात उभे राहणाऱ्या लढ्यांशी जोडून घेणे अत्यंत गरजेचे आहे. भांडवलशाहीत बाजाराच्या चौकटीला, खाजगी संपत्तीवर आधारित कुटुंबव्यवस्था आणि विवाहसंस्थेला विरोध करत शिक्षण, रोजगारच नव्हे तर आरोग्य, पेंशन, घरकुल, इतर लोकशाही-नागरी अधिकार इत्यादींसाठी संघटित लढा उभारूनच आपण हुंड्यासारख्या स्त्रीविरोधी प्रथांच्या मुळांवर आघात करू शकतो.

आम आदमी पक्षाचा जनद्रोही इतिहास व भांडवल-धार्जिणे राजकारण : एक दृष्टिक्षेप

‘आम आदमी पक्षा’च्या इतिहासातून त्याचे भांडवली वर्गचरित्र, त्याचे हिंदुत्वधार्जिणे, लोकशाहीविरोधी, कामगार व जनताविरोधी चरित्र, जातीयवादी राजकारण, भ्रष्टाचार-विरोधाचे थोतांड, दिल्ली मॉडेलच्या नावाने मोफत वीज, नवीन शाळा व महाविद्यालये, मोहल्ला क्लिनिकच्या नावाने केलेला फसवा प्रचार आज उघडपणे सर्वांसमोर आले आहेत.

धनिक शेतकरी आंदोलनाचे वर्गचारित्र्य उघड करणाऱ्या काही घटनांचे विश्लेषण

कुठलेही आंदोलन हे नेमके कोणत्या वर्गासाठीचे आहे हे त्या आंदोलनाच्या मागण्यांवरून ठरते. दिल्लीच्या सीमेवर गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन हे “शेतकऱ्यांचे” नसून धनिक शेतकरी, कुलक, बड्या शेतमालकांचे आहे, कारण ह्या आंदोलनाच्या मागण्या प्रामुख्याने बड्या शेतमालकांच्या हिताच्या मागण्या आहेत. शेतमालाला हमीभाव, नफ्याची हमी हीच या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे आणि ही मागणी फक्त धनिक शेतकऱ्यांच्या हिताची आहे; गरीब शेतकरी, शेतमजूर, शहरी कामगार वर्ग या सर्वांना या मागणीने नुकसानच होणार आहे