क्रांतिकारी कामगार शिक्षण मालिका -3
गोष्टी बदलण्यासाठी गोष्टी समजून घेणे आवश्यक असते. कामगार-कष्टकरी लोकांच्या शोषण आणि अत्याचारावर आधारित समाज बदलायचा असेल तर विद्यमान समाज समजून घ्यावा लागेल, त्याच्या इतिहासाचे ज्ञान मिळवावे लागेल. निसर्गाला बदलण्यासाठी सुद्धा ही बाब लागू होते. त्याचप्रमाणे समाज आणि निसर्ग बदलण्याचा प्रयत्न केल्याशिवाय, त्याच्याशी थेट भिडल्याशिवाय त्याला जाणून घेता येऊ शकत नाही. म्हणूनच, निसर्गाच्या क्रांतिकारी परिवर्तनाचा प्रश्न असो किंवा समाजाच्या क्रांतिकारी परिवर्तनाचा प्रश्न असो, त्याबद्दलच्या आपल्या ज्ञानाच्या विकासाची प्रक्रिया सखोलपणे समजून घेणे फार महत्त्वाचे आहे