Category Archives: स्‍मृति शेष

दु:खाच्या कारणांचा शोध घेणारा कलाकार : बर्टोल्ट ब्रेष्ट

“कला ही समाजाचा आरसा नाही तर समाज बदलण्यासाठी घाव घालणारा हातोडा आहे” ही त्याची कलेविषयक भुमिका होती आणि हीच भुमिका त्याच्या कवितांमधून आणि नाटकांमधून व्यक्त होते. अन्याय कधी अनंतकाळ टिकू शकत नाही. अपप्रचार आणि जनतेमध्ये असलेले सत्ताधारी वर्गाचे वर्चस्व अनंत काळ चालू शकत नाही, जनता सुद्धा आपल्या जीवनातील वास्तव समोर ठेऊन या अपप्रचाराविरोधत आणि शोषणा विरोधात आवाज उचलेल, कधी ना कधी जनतेचे शोषण करणाऱ्या समाज व्यवस्थेचा नायनाट होईल, अशी आशा दाखवत, अंधाऱ्या काळात लढणाऱ्या युवकांसाठी, कार्यकर्त्यांसाठी, कामगार कष्टकऱ्यांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी बर्टोल्ट ब्रेष्ट नेहमीच एक प्रेरणास्तंभ बनून राहील.

थॉमस  संकारा : आफ्रिकन क्रांतिकारी

आफ्रिकेतील अत्यंत गरीब देशात ज्याने भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले, जगातील साम्राज्यवादी देशांना घाबरून सोडले,  ज्याला वयाच्या 37 व्या वर्षी आपले प्राण गमवावे लागले. ज्याला आफ्रिकेचा चे गुवारा म्हणून ओळखले जाते, तो थॉमस  संकारा

गिरीश कर्नाड: एका निर्भय कलाकारास आदरांजली

ज्येष्ठ रंगकर्मी, नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता, विद्वान, उदारमतवादी, आणि प्रगल्भ सामाजिक जाणीव असलेला, सामाजिक-राजकीय प्रश्नांवर परखड आणि राज्यसत्तेविरुद्ध भुमिका घेण्यास न कचरणारा एक सच्चा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला.

अलविदा फिडेल! जगभरातील स्वातंत्र्यप्रिय जनता तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही!

क्यूबाच्या क्रांतीचे नेते आणि अमेरिकन साम्राज्यवाद विरोधी लढ्यातील झूंझार योद्धा असलेल्या फिडेल कास्ट्रो यांचे आपल्यातून कायमचे निघून जाणे, ही जागतिक मानवमुक्तीच्या लढयाची मोठी क्षति आहे. फिडेल बऱ्याच काळापासून आजारी होते, पण तरीही त्यांची केवळ उपस्थिति आणि लोकप्रियता सुद्धा मानव मुक्तिच्या लढ्याचा एक शक्तिस्रोत होती. कास्ट्रो व चे ग्वेरा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या क्यूबन क्रांतीनंतर अमेरिकेच्या नाकावर टिच्चून, सगळे अडथळे व षडयंत्र यांचा सामना करत क्यूबन जनतेने समाजवाद निर्मितीच्या दिशेने मोठी वाटचाल केली.

काॅम्रेड नवकरणला ‘कामगार बिगुल’तर्फे लाल सलाम

त्याच्या जाण्याने क्रांतिकारी चळवळीवर मोठा आघात झाला आहे. ही कोणत्याही एका संघटनेची क्षती नाही तर एकूण क्रांतिकारी चळवळीची क्षती आहे. अशा जिंदादिल तरुणाला श्रद्धांजली अर्पण करून आज त्याने पाहिलेले स्वप्न डोळ्यांत घेऊन क्रांतीच्या खडतर मार्गावरून आपल्याला पुढे चालत जावे लागेल. ज्यांच्यामुळे आमचा प्रिय साथी नवकरण आज आमच्यामध्ये नाही ती कारणे कायमची नष्ट करावी लागतील. नवकरण जीवनाच्या लढ्यात पराभूत झाला खरा, परंतु त्याचे लहानसे राजकीय जीवन इतरांना प्रेरणा देण्यासाठी पुरेसे आहे. कामगार बिगुलची त्याला श्रद्धांजली. त्याचे स्वप्न साकार करण्यासाठीचा संघर्ष सुरू ठेवण्याची शपथ आम्ही यावेळी पुन्हा एकदा घेत आहोत.